nanded sakal
नांदेड

Nanded News : नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार ; मतदार जागृतीत उत्कृष्ट कामगिरीची दखल

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांचे नियोजनबद्ध शिक्षण व निवडणुकीतील त्यांचा महत्त्वपूर्ण ठरणारा सहभाग याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांचे नियोजनबद्ध शिक्षण व निवडणुकीतील त्यांचा महत्त्वपूर्ण ठरणारा सहभाग याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्यांना मराठवाडा विभागातून उत्कृष्ट मतदार जागृती प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांच्यासमवेत उप जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाण, लोहा विभागाचे मतदान नोंदणी अधिकारी शरद मंडलीक यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राऊत यांनी मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी युवा मतदार नाव नोंदणी अभियान जिल्हाभर यशस्वीपणे राबविले. त्यामुळे तरुण आणि नवमतदारांची नव्याने भर पडली. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या दृष्टीनेही त्यांनी प्रयत्न केले. अशा नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य असेल तर त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राऊत यांनी पुढाकार घेतला.

भटक्यांसाठीही राबविले उपक्रम

जिल्ह्यातील तृतीयपंथी, भटके विमुक्त, गारुडी, कुडमुडे जोशी व इतर समाजातील लोकांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी पुढाकार घेतला. त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासह निवडणूक ओळखपत्र देवून मतदानाचा अधिकार बहाल केला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील विविध भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांना भेटी देवून त्यांच्याशी संवाद साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT