Balasaheb Thorat 
नांदेड

मते मागण्याचा भाजपला अधिकार नाही, महागाईवरून थोरातांची टीका

आता भाजपला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बिलोली (जि.नांदेड) : काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोलचे भाव पन्नास पैसे किंवा एक रुपयाने वाढले तर भाजपचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. आता केंद्रात भाजपची सत्ता असताना इंधनाचे भाव गगनाला भिडले असून महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहे. अशा महागाईत मते मागण्याचा भाजपला अधिकार नसल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. २६) चिटमोगरा (ता. बिलोली) येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, भाजप नेते शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करतात आणि शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतात. दिल्लीच्या सीमेवर नऊ महिन्यांपासून शेतकरी (Deglur Bypoll) आंदोलन करत आहे. या आंदोलनातील काही शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले. त्यामुळे आता भाजपला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. माजी मंत्री रमेश बागवे तसेच दिलीप पाटील बेटमोगरेकर, डॉ. मीनलताई खतगावकर, अनिरुद्ध बनकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सतीश पाटील चिटमोगरेकर यांनी प्रास्ताविक केले.

अशोकरावांच्या पाठीशी राहा

शेतकरीहिताची अनेक कामे केल्याने ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. शेतकरी जगला तरच देश जगेल, हीच संकल्पना हाती घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा जिल्ह्यासह मराठवाड्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतात. अशोकरावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अंतापूरकरांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT