देगलूर : वीजबिलांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या महावितरणच्या मदतीला आता बळीराजा धावला आहे. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीत सवलत देणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास नांदेड परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देगलूर विभागातील 147 कृषिपंप ग्राहकांनी 23 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा करुन 22 लाख रूपयांची सवलत मिळवली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी केले आहे.
महावितरणचे संचालक सतिश चव्हाण, मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या प्रमूख उपस्थितीत देगलूर विभगाच्या परिसरात मंगळवार (ता. 15) पार पडलेल्या थकबाकीमुक्त शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळयाप्रसंगी श्री अंतापूरकर बोलत होते. शेतकऱ्यांचे स्वप्नपुर्ती करणारे हे अभियान असून थकबाकीदार शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेत थकबाकीमुक्त व्हावे. नवीन वीज जोडणीसाठीही कृषी ऊर्जा अभियानामध्ये तरतूद असून एकूणच शेतकरी हिताचे हे अभियान असल्याचे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी कृषी ऊर्जा पर्वाच्या जनजागृतीसाठी आलेले महावितरणचे वाणिज्य संचालक सतिश चव्हाण यांनी माझे बील माझी जबाबदारी या होर्डिंगचे देगलूर विभागीय कार्यालयात अनावरण केले व शेतकऱ्यांनी या सुर्वणसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
एका क्लिकवर बिलाची माहिती
कृषिपंप वीजबिलाची थकित रक्कम व अभियानाच्या माध्यमातून मिळणारी सवलत याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app ही लिंक तयार केली आहे. या लिंकवर बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून एकूण थकबाकी, सवलतीची रक्कम व भरणा करावयाच्या रकमेचा तपशील मिळवता येतो व वीजबिलाबाबत शंका असल्यास तक्रारही करता येते.
६६ टक्के रक्कम विद्युत विकासासाठी वापरणार
या अभियानात कृषिपंपधारकांकडून वसूल होणाऱ्या वीजबिलाच्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणही कृषीपंपधारकांना सुरळीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. याप्रसंगी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, कार्यकारी अभियंता श्री श्रीनिवास चटलावार, प्रणाली विश्लेषक तौसिफोद्दीन पटेल आणि सर्व शाखा अभियंता व जनमित्र उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.