मारतळा ता. लोहा येथील बँक शाखेतील प्रकार 
नांदेड

बँक अधिकाऱ्यांची शेतकऱ्यास धक्काबुक्की; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मारतळा येथील शाखेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान वाटप मागील सहा महिन्यापासून कासव गतीने सुरुच आहे.

गणेश ढेपे

मारतळा ( जिल्हा नांदेड ) : जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मारतळा (ता. लोहा ) येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप वेळेत होत नसून, दलाला मार्फत कामे होत असल्याच्या तक्रारी असतानाच सोमवारी (ता. २१ ) एका शेतकऱ्यांस शाखाधिकारी व तपासणी अधिकारी यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करुन चक्क बँके बाहेर हाकल्याची लेखी तक्रार श्रीकांत वडवळे कापसीकर या शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी व मुख्य जिल्हा बँक व्यवस्थापकाकडे केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मारतळा येथील शाखेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान वाटप मागील सहा महिन्यापासून कासव गतीने सुरुच आहे. याबाबतच्या तक्रारी असूनही वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याने, येथील अधिकारी मनमानी करत वाटप प्रक्रिया सुरुच आहे. ठरलेल्या नियमाप्रमाणे (ता. १० जुन ) पर्यंत वाटप प्रक्रिया पूर्ण करणे ठरलेले असताना. ऐन पेरणीच्या दिवसात शेतकरी कामे सोडून बँकेत हेलपाटे मारत आहेत. अन अधिकारी कासवगतीने अनुदान वाटप करत आहेत. शेतीची कामे करावीत की, बँकेच्या रांगेत थांबावे असा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा - नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली

मात्र रांगेतील उभे अन् रोजदारीवरील सेवक व अन्य दलाल शेतक-यांकडून पैसे उकळत आहेत. सदर प्रकार श्रीकांत वडवळे कापसीकर या शेतक-यांच्या निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी व्यवस्थापक व तपासणी अधिकारी यांना जाब विचारताच एकच गोंधळ झाला. त्यांना उपरोक्त अधिकाऱ्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करुन बँके बाहेर हाकलल्याची लेखी तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य जिल्हा बँक व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. तसेच तुझे काम करायचे असेल तर एक हजार रुपये दे असे अधिकाऱ्यांनी मागणी केल्याचे त्यात नमुद केले आहे.

कोरोनाचा काळ असल्याने एकदम ३०- ३५ जण माझ्याकडे आले. तेव्हा मी त्यांना गर्दी करु नका असे मी समजुन सांगत होतो. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हते. त्यामुळे सर्वांनाच कडक शब्दात सुचना करत बाहेर जाण्यास सांगितले एवढेच. त्यात शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचा विषयच नाही.

येथे क्लिक करा - परभणी जिल्ह्यातील पाथरीपासून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला 387 ठिगळं; गुणवत्ता तपासण्याची गरज

- श्री. सल्लावार, शाखाधिकारी, मारतळा.

बँकेत गोंधळ झाला, तेव्हा मी बँकेत नव्हतो. कामानिमित्त बाहेर होतो. नंतर आलो तेव्हा धक्काबुक्कीचा विषयच नाही.

- माधव कदम, तपासणी अधिकारी.

काम लवकर करणेसाठी मला दोनशे रुपये सेवक मागत होता. तोच दलाली करत पैसे घेऊन कागदपत्रे पुढे पाठवत असल्याचे सांगितले.

-गोविंद जाधव, शेतकरी, हिंदोळा

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT