korona logo.jpg 
नांदेड

मुंबईवरुन आलेला बारडचा तरुण पाॅझिटिव्ह....रुग्ण संख्या ५३ वर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुंबई येथून मुदखेड तालुक्यातील बारड येथे आलेल्या बावीस वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल मंगळवारी (ता. १२) पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. मंगळवारी एकूण २४ जनांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील २३ जनांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 

गावात येताच केले क्वांरटाइन
बाधीत तरुण कुटुंबासह बारडकडे येण्यासाठी मुंबईहून पायी निघाला होता. त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. मंठा येथून एक वाहन मिळाल्यानंतर हे सर्व जण रविवारी (ता. १०) बारडला पोहचले होते. यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, धर्मशाळा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये क्वांरटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आला. यात तो तरुण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी आढळून आले. यामुळे माहूरनंतर आता बारडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सदर तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.

मुंबई येथून २२ जण आले पायी
मुंबई येथून निघताना यांची कुठेही तपासणी झाली नाही. हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते. एकूण २२ जण मुंबई येथून पायी आले होते. त्यापैकी चार जणांना आजाराचे लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांचे नमुने तपासासाठी घेतले होते. पैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तिघांचा अहवाल येणे बाकी आहेत. हे प्रवासी नागरिक बारडमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. यामुळे ते बारड येथे कोणाच्याही संपर्कात आले नाहीत. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या हद्दीत होती. परंतु चार दिवसांपूर्वी माहूर येथील एक साठ वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यानंतर मंगळवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे एक तरुण कोरोनाग्रस्त निघाल्याने ग्रामिण भागातही आता चिंता व्यक्त केली जात आहे.

एक लाख ६९८ व्यक्तींची तपासणी
मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एकूण एक लाख ६९८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील दोन हजार दोन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी १७३० जनांचा अहवाल निगेटीव्ह तर ५३ जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १८८ जनांचा अहवाल प्रलंबीत आहेत. यातील पाच नागरिकांना उच्चरक्तदाब व मधुमेह होता. यामुळे त्यांनी औषधोपचारास प्रतिसाद दिला नसल्याने मृत्यू झाल्याची माहिती डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याकडून मिळाली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT