File photo 
नांदेड

नांदेड : ना सोशल डिस्टन्सिंग, ना सॅनिटायझर, सिगारेटचाही निघतोय धूर 

प्रमोद चौधरी

नांदेड : राज्य सरकारने बिअर बारमध्ये बसून मद्य पिण्यास नियमांच्या आधारावर परवानगी दिली. मात्र जिल्ह्यात बहुतांश बिअर बारमध्ये नियमांचा अक्षरशः फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. ना सोशल डिस्टन्सिंग पाळली जात, ना सॅनिटायझरचा वापर होतो. ग्राहक सोडाच वेटरही मास्कचा वापर करत नाही. त्यामुळे बिनधास्त मद्यप्राशनाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मद्यविक्रीतून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. कोरोना संकट काळात या महसुलावर शासनाला पाणी फेरावे लागले. लॉकडाउनमध्ये मे महिन्यात शिथिलता देण्यात आल्यावर वाइन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानंतर नुकतीच रेस्टॉरंट, बिअरबार सुरु करण्यासही परवानगी मिळाली. जिल्ह्यात जवळपास ५०० पेक्षा अधिक बिअरबार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. परवानगी देताना ग्राहकांची गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर, स्वच्छता राखावी आदी प्रकारचे निर्देश देण्यात आले. या नियमांची अमलबजावणी होणे अपेक्षित होते. तशा सूचनाही बिअर बार मालकांना देण्यात आल्या होत्या. 

मात्र, त्याकडे दुर्लक्ष चालविल्याची ओरड ऐकायला मिळते. धक्कादायक बाब म्हणजे, मद्यपी बारमध्ये बसूनच सिगारेटचा धूरही सोडतात. त्यातून वादाची ठिणगी पडत आहे. आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर शौकिनांना बारमध्ये बसून मद्याचे घोट रिचवण्याची संधी मिळाली आहे. आता वेळेतही बदल झाला. त्यामुळे रात्री आठ वाजतानंतर घराबाहेर पडून बारमध्ये उशिरापर्यंत बसण्याचा प्रकारही सुरु झाला आहे. 

उघड्यावरही रिचवितात घोट
बिअर बारमध्ये बसून शौक केल्यास त्याचा अधिकचा भुर्दंड खिशावर पडतो. त्यामुळे अनेक शौकीन वाइन शॉपीतून कमी किमतीत दारू विकत घेऊन बाजूलाच असलेल्या हातठेल्यावर मद्याचे घोट रिचवितात. त्यामुळे वाइन शॉपच्या बाजूलाच मद्यपींची जत्रा नांदेड शहरात ठिकठिकाणी बघावयास मिळत आहे. पोलिसांकडून या ठिकाणांवर छापा टाकून कारवाई झाल्याचे मात्र अद्यापही ऐकिवात नाही. 

राज्य उत्पादन शुल्काची डोळ्यावर पट्टी  
परवानाधारक बिअर बार मालकांना शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, या सूचनांचे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावर पट्टी दिसून येत आहे. त्यांच्या या चुकीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची बळावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT