bhagat singh koshyari
bhagat singh koshyari bhagat singh koshyari
नांदेड

'लोकांमध्ये मिसळल्यावरच नवीन गोष्टी शिकायला भेटतात'

सकाळ वृत्तसेवा

राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यापासूनच श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.

नांदेड: छत्रपती शिवाजी महाराज, श्री गुरु गोविंदसिंगजी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे महापुरुष माझ्यासाठी राम, कृष्ण या दैवताप्रमाणे आहेत. सद्यस्थितीत सर्वच महापुरुषांच्या बलिदानाचा विसर पडत चालला आहे, हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करून मला लोकांमध्ये मिसळून रहायला आवडते. लोकांमध्ये गेल्यावरच अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात कुठे जाता आले नाही. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेतल्यापासूनच श्री गुरुगोविंद सिंगजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक, व्यवस्थापन समिती सदस्यांना मार्गदर्शनप्रसंगी गुरुवारी (ता. पाच) ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी विमानतळावर उतरल्यानंतर थेट विद्यापीठात पोहोचले. तेथे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यपालांना विविध विकासकामांची चित्रफीत दाखविण्यासाठी विद्यापीठात जय्यत तयारी केली होती. पण ऐनवेळी राज्यपालांनी मला समोरच्या इमारतीवरून परिसर पाहायचा आहे. चित्रफीत नंतर दाखवली तरी चालेल, असे म्हटल्याने विद्यापीठाचे नियोजन बिघडले. परिसर बघून आज मैं बहोत खुश हुआ, अशा शब्दात प्रतिक्रिया देत विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यांसोबत सेल्फीचा आनंदही त्यांनी घेतला.

दौऱ्यावर कोण राजकारण करतय...
राज्यपाल भगतसिंघ कोश्यारी यांच्या तीन जिल्ह्यातील दौऱ्याला राष्ट्रवादी कॉँग्रेसने विरोध दर्शविला. याबाबत राज्यपाल यांना पत्रकारांनी विचारले असता, कोण राजकारण करीत आहेत. तुम्ही तर करत नाही ना?, असा उलट प्रश्न पत्रकारांना करून या विषयावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

बंदमुळे व्यापारी झाले संतप्त
राज्यपाल जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुकाने, छोटे व्यापारी, खाण्यापिण्याचे पदार्थ, फळांचे गाडे यांना पोलिसांनी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले होते. कालच दुकाने बंद ठेवण्याची कल्पना दिली असती तर आम्ही तशी तयारी केली असती. एवढे नुकसान झाले नसते, अशा संतप्त प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT