Nanded sakal
नांदेड

Bharat Jodo Yatra : पक्ष नव्हे चळवळीप्रमाणे कॉंग्रेस मैदानात लोकगीते प्रबोधनगीते

ताकदीने पक्ष मैदानात उतरल्याचे यातून दिसत एखाद्या चळवळीप्रमाणे गीत गाऊन विचारांचा प्रचार प्रसारावर पक्षाचा भर आहे

विकास देशमुख

पार्डी मक्ता : 'शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण; आनंदात नांदत होते हिंदू-मुसलमान' ही आणि इतर गीते, लोकगीते, क्रांतिगीते कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत ऐकायला मिळत आहेत. ताकदीने पक्ष मैदानात उतरल्याचे यातून दिसत आहे. एखाद्या चळवळीप्रमाणे गीत गाऊन विचारांचा प्रचार प्रसारावर पक्षाचा भर आहे. त्यातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत आहे.

कलावंतांनी रिंगण करून डफडीवर दिलेली थाप, गगनभेदी पहाडी आवाजातील गाणे, मध्येच श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडूनच हवे ते उत्तर घेणे त्या पाठोपाठ माहिती पत्रकांचे वाटप करणे आणि झपाझप चालायला लागणे, ही खरे तर डावे पक्ष, आंबेडकरी चळवळ यांची प्रचार पद्धत. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा माध्यम कमी होती तेव्हा कॉंग्रेसनेही देश स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी याच पद्धतीने जनजागृती केली.

पण, पुढे कॉंग्रेस सत्तेत आला. दीर्घकाळ पक्ष सत्तेत राहिला. त्यामुळे पक्षाला या पद्धतीच्या प्रचाराचा विसर पडला. पण, भारत जोडो यात्रेत पक्षाने पुन्हा प्रचारासाठी कलावंतांची मदत घेतली आहे. यात्रेत पुण्यातील शंभर कलावंतांची 'लोकायत' ही संघटना अंत्यत प्रभावीपणे लोकगीते, क्रांतीगीतांचे गायन करीत आहे. त्यातून समाजवादाचे विचार सांगत आहे. ही गीते ऐकून ऐकणार्‍यांना स्फुरण चढत आहे. अंगावर शहारे येत आहेत. सायंकाळी यात्रा सभास्थळी गेल्यानंतर तिथेही अनिरुद्ध वनकर यांचा 'वादळवारा' हा शाहिरी जलसा होत आहे.

'लोकायत'मुळे खिळवून राहतात लोक

पुण्यातील लोकायत या संघटनेचे कलावंत देगलूरपासून या यात्रेत सहभागी आहेत. जळगाव जामोदपर्यंत ते असणार आहेत. लोकायतचे कलावंत गाणी म्हणत, वाद्य वाजवत चालत आहेत. त्यामुळे पायी चालणार्‍या इतरांना थकवा जाणवत नाही. लोक खिळून राहत आहेत.

आमची संघटना ही गांधी-नेहरू-बाबासाहेब यांच्या विचारांवर आधारित आहे. सांस्कृतिक माध्यमातून आम्ही कॉंग्रेससाठी काम करतो. लोकशाही टिकवण्यासाठी कॉंग्रेसची गरज आहे.

- तुषार रईसा, कलावंत लोकायत संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT