नांदेड  sakal
नांदेड

Nanded : भारत जोडो निमित्ताने खड्डे जोडो!

रस्त्याची दुरुस्ती केवळ नेत्यांच्या दौऱ्यानिमित्तच करू नये

राजेश नागरे

देगलूर : नांदेड - देगलूर रस्त्याची तब्बल पाच वर्षांनंतर या रस्त्यावर टोल वसूल करणाऱ्या कंट्रक्शन कंपनीने तातडीने दुरुस्ती केली. त्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा या रस्त्यासाठी खड्डे जोडो यात्रा ठरली आहे.

नांदेड ते देगलूर हा रस्ता जवळपास ८० ते ८५ किलोमीटर आहे. हा रस्ता महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेला जोडतो. महाराष्ट्रातील हा शेवटचा रस्ता आहे. यावर दोन ठिकाणी टोल वसुली केली जाते. याची इतर रस्त्यांप्रमाणे दुरवस्था झाली नसली तरी काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले होते. रस्त्याच्या कडेला झाडे - झुडपे वाढली होती. कडाही खचल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. पण, मागील पाच वर्षांत संबंधितांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, या रस्त्यावरून कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जाणार असल्याने संबंधितांनी तत्काळ खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती केली. रस्त्याच्या कडेने असलेली झाडे-झुडपे तोडून कडा भरल्या. त्यामुळे राहुल गांधी यांच्यामुळे या रस्त्याचा विकास झाला, अशी प्रतिक्रिया या मार्गावरील नागरिकांनी दिल्या.

दिल्या होत्या अनेक नोटीसा

या रस्त्याची दुरुस्ती करावी, या बाबत या पाच वर्षांत नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला नोटीसा दिल्या होत्या. मात्र, एकाही नोटीशीची आजपर्यंत दखल घेतली नव्हती.

पूल, मैलाच्या दगडाची रंगरंगोटी

या रस्त्यावरील छोटे - मोठे पूल, सर्वच मैलाचे दगड यांचीही दोन दिवसांत रंगरंगोटी करण्यात आली आहे.

रस्त्याची दुरुस्ती केवळ नेत्यांच्या दौऱ्यानिमित्तच करू नये. सामान्य नागरिकांसाठी, वाहनधारकांसाठीही ती नियमित करावी. त्यामुळे अपघात टळतील.

- कैलास भालेराव, सामाजिक कार्यकर्ते, नायगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT