Rahul Gandhi  Sakal
नांदेड

Bharat Jodo Yatra Nanded : नवतरुणांत राहुल गांधींची ‘क्रेझ’!

भारत जोडोच्यानिमित्ताने गांधी घराण्याचा वारस प्रथमच देगलुरात

सकाल वृत्तसेवा

देगलूर : गेली अनेक वर्ष देशात काँग्रेसचीच सत्ता होती. त्यातही सत्तेवर गांधी घराण्याचेच वर्चस्व राहील्याने त्यांचाच रिमोट चालायचा. त्यामुळे गांधी घराण्याबद्दल संपूर्ण देशात अप्रूप वाटणे साहजिक आहे. कर्नाटक, आंध्र, तेलंगणाच्या सीमेवर वसलेल्या देगलूर शहर परिसरात बहुतांशी तेलगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. निरक्षरांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असल्याने पूर्वापार काँग्रेसच्याच विचारधारेवर असणाऱ्या येथील मतदारांत गांधी घराण्याबद्दल मोठे आकर्षण होते. ते यात्रेच्या निमित्ताने पुन्हा बघायला मिळाले.

देगलुरात येणारे देशपातळीवरील राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आदी मान्यवरांची मंदीयाळी दाखल होण्याने, त्यांना प्रत्यक्ष बघता येणार, ऐकता येणार, सोबत चालताही येणार यामुळे असलेली उत्सुकता फळाला आल्यामुळे नवतरुणांमध्ये चैतन्य दिसून आले.

आजी आल्या होत्या सीमेवर,नातू आला शहरात

इंदिरा गांधी एक वेळेस येथून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या मदनुरमंडळ जिल्हा कामारेडी (तेलंगणा) येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आल्या होत्या. त्यावेळेस त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी येथील नागरिकांसह महिला मोठ्या प्रमाणात मदनुर येथे गेल्या होत्या. त्यानंतर तब्बल ४० वर्षानंतर त्यांचा नातू राहुल गांधी ‘पदयात्रेच्या’ निमित्ताने देगलुरात येणार असल्याने त्यांच्या यात्रेविषयी मोठी उत्सुकता लागून राहिली होती.

यात्रेचे भव्य-दिव्य स्वागत

भारत जोडो यात्रा देगलूर येथे येणार असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम महिनाभर तयारीसाठी लागली होती. आमदार जितेश अंतापूरकर, प्रीतम देशमुख, मोगलाजी शिरसेटवार या शिलेदारांनी जबाबदारी उचलल्यानेच यात्रा यशस्वी झाली. पाहुण्यांची आदरतिथ्य करण्यात आल्याने पाहूणेही सेवेने भारावल्याचे दिसले.

यात्रेच्या निमित्ताने काही प्रश्न केंद्रस्थानी

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, महागाई, बेरोजगारी, जुनी पेन्शन, संविधान बचाव भारत जोडो यात्रेनिमित्ताने तरुणांसह, आबालवृद्ध, महिलांमध्ये या व इतर प्रश्नांची चर्चा केंद्रस्थानी राहिली. इतर राज्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना काँग्रेसचे सरकार आले तर लागू होईल या आशेने नवकर्मचाऱ्यांनी यात्रेत रक्तदान शिबिर आयोजित करून राहुल गांधींचे लक्ष वेधून घेतले.

‘तो आला...त्याने...जिंकले’

सोमवारी (ता.सात) रोजी सिख धर्मीयांचे संत गुरुनानक यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला देगलुरच्या सभेनंतर काढण्यात आलेली २००० युवकांची मशाल रॅली अभुतपूर्वच होती. वनाळी येथील गुरुद्वारात राहुल गांधीनी मध्यरात्री केलेली ‘अरास’ त्यानंतर उत्तररात्री पुन्हा देगलूर मुक्कामी येऊनही मंगळवारी (ता.आठ) रोजी तेवढ्याच उत्साहाने प्रातःकाली पदयात्रेला केलेली सुरुवात हे सर्वच तरुणाईच्या उत्साहाला उधाण आणणारे होते. यात्रेमुळे देशभरातील विविध स्तरातील नागरिकांच्या येण्याने देगलुरातील काँग्रेसला आलेली मरगळ दूर होईल की नाही, माहित नाही पण संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांना मात्र यात्रेने बळ दिले एवढे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT