Bharat jodo yatra rahul gandhi tribute to rajiv gandhi at narasi fata maharashtra politics  sakal
नांदेड

...अन् ‍नरसी फाट्यावरील वातावरण भावुक

राजीव गांधी यांच्या महाराष्ट्रातील शेवटच्या सभेच्या आठवणी ताज्या

- अतुल पाटील

नायगाव (जि. नांदेड) : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी ज्या नरसी फाट्यावर महाराष्ट्रातील शेवटची सभा झाली होती, त्याच ठिकाणी बुधवारी (ता. नऊ) सकाळी त्यांचा मुलगा, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वडिलांना आदरांजली वाहिली. या ठिकाणचे वातावरण काही काळ भावुक बनले होते. ज्येष्ठ मंडळींनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. ‘भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या दिवसाची सुरवात शंकरनगर (जि. नांदेड) येथून सकाळी साडेसहाला झाली. किनाळा, हिप्परगा या गावांत स्वागत स्वीकारत यात्रा साडेसातला नरसीमध्ये आली.

रस्त्याच्या दुतर्फा नागरिक होते. नरसी फाटा या चौकातही छोटेखानी व्यासपीठ उभे केले होते. व्यासपीठावर माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. नरसी फाट्यावर राहुल गांधी पोचल्यानंतर त्यांनी दोन्ही प्रतिमांना पुष्प अर्पण केले. यावेळी काही काळ वातावरण भावुक झाले. लगेच यात्रा नायगावकडे मार्गस्थ झाली.

इंदिराजींचा नातू पहाण्याची उत्सुकता

नरसी फाट्यावरून नायगावकडे येत असताना सकाळी आठच्या दरम्यान, राहुल गांधी यांनी नुरी फंक्शन हॉलमध्ये नाश्ता केला. साडेआठला पुन्हा पदयात्रेला सुरवात केली. यावेळी काहींनी कोळी बांधवांच्या वेशात राहुल यांची भेट घेतली. दुतर्फा उभ्या असलेल्यांपैकी एका मुलाने भेटायची इच्छा व्यक्त केली. राहुल यांनी ती पूर्ण केली त्याला सोबत घेऊन विचारपूस केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा नातू बघायला मिळावा, म्हणून अनेक ज्येष्ठ महिला पाच-सहा किलोमीटरची पायपीट करत नायगावपर्यंत आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: शेवता येथे अंतर्गत वादातून एकाचा खून; तीर्थपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: : राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार

CM Yogi Adityanath: माघ मेळा २०२६ ची तयारी जोरात: १५ कोटी भाविकांसाठी योगी सरकारचा मोठा प्लॅन

Malegaon Court Violence : अफवेमुळे मालेगाव न्यायालय परिसरात संतप्त जमावाचा धुडगूस; मोठा अनर्थ टळला

TET Exam Paper Leak : कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी छापा टाकताच एकच खळबळ उडाली; शिक्षकांचाही समावेश

SCROLL FOR NEXT