file photo
file photo 
नांदेड

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती कात टाकणार - पालकमंत्री अशोक चव्हाण 

प्रल्हाद कांबळे

नांदेड - भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात असलेल्या नवीन कार्यालयीन इमारतीत विद्युतीकरण व नवीन फर्निचर उभारणीसाठीच्या 42 लाख 92 हजार रूपयांच्या प्रस्तावास राज्याच्या पणन संचालनालयाने नुकतीच मंजूरी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नास यश मिळाले आहे. विद्युतीकरण व नवीन फर्निचर उभारणीचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याचा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व संचालकांनी व्यक्त केला आहे.

भोकरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील नवीन कार्यालयीन इमारतीत विद्युतीकरण व नवीन फर्निचरण उभारणीसाठीचा प्रस्ताव राज्याच्या पणन संचालनालय विभागाकडे सादर करण्यात आला होता. नवीन इमारतीतील विद्युतीकरण व नवीन फर्निचरण उभारणीसाठी एकत्रित 42 लाख 92 हजार रूपयांचे एकत्रीत अंदाजपत्र सादर करण्यात आले होते. सदरचा खर्च बाजार समिती स्वनिधीतून करणार असल्याने मंजूरी द्यावी अशी मागणी विभागीय सनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात करण्यात आली होती.

अशोक चव्हाण यांच्याकडेही पाठपुरावा केला होता

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व संचालकांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बाजार समितीच्या मुख्य इमारतीतील विद्युतीकरण व फर्निचर उभारणीसाठीच्या प्रस्तावास मंजूरी मिळावी यासाठी पणन संचालनालय विभागाकडे प्रयत्न केले होते.

विद्युतीकरण व नवीन फर्निचर उभारणीचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याचा विश्वास

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नास यश आले असून राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन इमारतीतील विद्युतीकरण व नवीन फर्निचरण उभारणीसाठीच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे पत्र भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना दिले आहे. विद्युतीकरण व नवीन फर्निचर उभारणीचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याचा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व संचालकांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT