bhokar nanded assembly election solve electricity issues immediately ashok chavan orders msedcl officials politics Sakal
नांदेड

Nanded News : अर्धापूर, मुदखेड व भोकर या तीन तालुक्यातील विजेच्या अडचणी तत्काळ सोडवा; अशोक चव्हाण

अशोक चव्हाण; महावितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर, मुदखेड व भोकर या तीन तालुक्यातील विजेविषयी अडचणीं तत्काळ सोडवा, अशी तंबी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

डीपी नादुरुस्त होणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे यांसह विविध अडचणी विषयी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना देऊन चांगलेच धारेवर धरले. अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तीन तालुक्यातील गावात महावितरण कंपनीच्या कामकाजाविषयी शेतकरी, ग्राहक, उद्योजक यांच्या तक्रारी आहेत.

वारंवार वीज खंडीत होणे, नादुरुस्त डीपी चालू करण्यासाठी बराच कालावधी लगणे, विद्युत जोडणी देण्यासाठी महिने लागणे, ग्राहकांचे फोन न घेणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. महावितरण कंपनीच्या कामकाजाला सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघातील महावितरण कंपनीचे अधिकारी व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत महावितरण कंपनीचा कारभाराविषयी चर्चा झाली.

अधिकऱ्यांना चांगलेच धारेवर धरुन ग्राहकांची कामे तातडीने करण्यात यावीत, नादुरुस्त डीपी तत्काळ बदलून देण्यात यावेत, असे आदेश माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी दिली.

यावेळी बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसबीर खतीब, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, अमोल डोंगरे, बाजार समितीचे संचालक निळकंठ मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे, गजानन कदम, भाऊरावचे संचालक सुभाषराव देशमुख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT