file photo 
नांदेड

नांदेडचे भुमिपुत्र तथा यशदाच्या या अधिकाऱ्याचा मुंबईमध्ये राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेडचे भुमिपुत्र तथा यशदा पुणे येथील संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि सुशोभिता वेल्फेअर असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 'राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार' देऊन मुंबई येथे एका भव्य कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांसह मित्रमंडळी उपस्थित होती.

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया ही संस्था समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर समाजरत्न पुरस्कार देत असते. या वर्षी या पुरस्कारासाठी डॉ. बबन जोगदंड यांची निवड करण्यात आली. जोगदंड यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले असून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या जवळपास दोन हजारहून अधिक युवकांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत १५ विषयात पदव्या संपादन केल्या आहेत. 

हा कार्यक्रम नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात घेण्यात आला

अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांनी वेळोवेळी सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मंगळवारी (ता. २३) फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमाला सुशोभिता वेल्फेअर असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक शोभा कोकीतकर, एन. के. ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नारायण सातपुते, हिंद केसरी वस्ताद विष्णू जोशीलकर, मिस इंडिया सिमरन आहुजा, सिने व नाट्य अभिनेते रवींद्र सरदार, बाबा केरडे व प्रसिद्ध संगीतकार डॉ. संतोष बोराडे यांची उपस्थिती होती.

श्री. जोगदंड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले

हिंदकेसरी वस्ताद विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते डाॅ. बबन जोगदंड यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. श्री. जोगदंड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आजच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT