file photo 
नांदेड

कृष्णूर धान्य घोटाळ्यातील आरोपी वेणीकरांच्या अडचणीत वाढ, बिलोली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : मागील वर्षभरापासून फरार असलेले कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील फरार आरोपी संतोष वेणीकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन न्यायालय व तपास यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याचे नमूद करून बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी (ता. चार) फेटाळून लावला. त्यामुळे फरार आरोपी संतोष वेणीकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीआयडीकडे शरण गेल्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो लिमिटेड कंपनीत जुलै २०१८ मध्ये शासकीय धान्याचा घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. संबंध महाराष्ट्रभर गाजलेल्या या प्रकरणात २० पेक्षा अधिक आरोपीस आजपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याच प्रकरणात आरोपी असलेले तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे अद्यापपर्यंत फरारी आहेत. नायगाव व बिलोली येथील न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनवणे यांनी वेणीकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर वेणीकर यांनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी याप्रकरणी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयाने आरोपीस काही प्रमाणात दिलासा देत तीन दिवसात कुंटुर पोलिस ठाण्यात स्वतः हून अटक होवून पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याची सूचना केली होती. वर्षभरापासून फरार असलेले आरोपी संतोष वेणीकर यांना ही संधी होती. मात्र वेणीकरांनी पोलिस ठाण्यात हजर न होता कुंटुर पोलिसच मला अटक करुन घेत नाहीत असे युक्तिवाद करणारे खोटे पत्र दाखल केले व न्यायालयाने आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती.

याप्रकरणी बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी आरोपी वेणीकर हे कायद्याचे चांगले जाणकार असून ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा दुरुपयोग करुन न्यायालय व तपास यंत्रणेची दिशाभूल करीत असल्याचे मत नोंदवून वेणीकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. संदीप कुलकर्णी कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली तर आरोपीच्या वतीने अॅड. डी. के. हांडे यांनी बाजू मांडली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका गणपतीपुळे देवस्थानाला; लाडू प्रसाद बंद

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT