file photo 
नांदेड

बिलोली: लॉटरीच्या नावाखाली एकाला ५२ हजाराचा गंडा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : तुम्हाला ॲक्टीव्हा गाडी आणि अडीच तोळे सोन्याची लॉटरी लागली आहे. तुम्हाला पाहिजे नसल्यास १५ हजार रुपये घ्या किंवा नको असल्यास तुमच्याकडील दोन तोळे सोने पावतीसह द्या असे म्हणून ५२ हजाराचे सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. हा प्रकार दगडापूर (ता. बिलोली) येथे ता. १८ जून रोजी घडला. 

दगडापूर (ता. बिलोली) येथील हॉटेल चालक महेबूबखान गफारखान पठाण (वय ५६) हे ता. १८ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरी होते. यावेळी त्यांच्या घरी अनोळखी दोन युवक गेले. पठाणसाहेब घरी आहेत का असा आवाज देताच महेबुब पठाण बाहेर आले. यावेळी या दोन्ही युवकांनी आपणास ॲक्टीव्हा गाडी व अडीच तोळे सोन्याची लॉटरी लागली आहे. ते आपणास देण्यासाठी आम्ही आलो आहे. लॉटरी लागल्याचा आनंद पठाण यांना झाला. त्यांनी या दोन्ही अनोळखी युवकांना घरात बोलावून घेतले. 

५२ हजार २९० रुपयाचा ऐवज लंपास
 
यावेळी जर तुम्हाला लॉटरीतील ॲक्टीव्हा गाडी आणि सोने पाहिजे नसल्यास आमच्याकडील १५ हजार रुपये तुम्ही घ्या. आम्ही तुम्हाला लागलेल्या वस्तु ठेवून घेतो. जर तुम्हाला ॲक्टीव्हा व सोने पाहिजे असल्यास तुमच्याकडील दोन तोळे सोने बील पावतीसह द्यावे लागेल. असे म्हणताच कानातील झुमके (दहा ग्राम) व गळ्यातील सेवनपीस (सात ग्राम) असे ५२ हजार २९० रुपयाचा ऐवज घेतला. महेबुबखान पठाण यांना आपल्या दुचाकीवरुन बिलोली येथे ॲक्टीव्हा शोरुमला नेले. तेथे गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा रंग कोणता पाहिजे असे विचारले. तसेच तुमचे आधारकार्ड व इतर कागदपत्राचे झरॉक्स द्यावे लागतील. 

अनोळखी युवकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

महेबुबखान हे झेरॉक्स आणण्‍यासाठी शोरुमच्या बाहेर गेले असता सोन्याचे दागिणे घेतलेल्या दोन्ही अनोळखी चोरट्यांनी तेथून पोबारा केला. झेरॉक्स घेऊन आल्यानंतर पाहतात तर हे दोन्ही युवक त्यांना तिथे दिसले नाही. त्यांनी शोरुममध्ये लॉटरीसंदर्भात माहिती घेतली असता असा काही प्रकार आमच्याकडे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी मात्र त्यांना धक्का बसला. घडलेला प्रकार त्याने आपल्या घरी सांगुन बिलोली पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी केली. शेवटी महेबुबखान पठाण यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी युवकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. केंद्रे करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT