Doctor Devanand Jaju End Himself In Nanded esakal
नांदेड

नांदेडमध्ये भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख देवानंद जाजूंची आत्महत्या

डाॅ.देवानंद जाजू गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये वैद्यकीय सेवा देत होते.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : नांदेडमधील प्रसिद्ध डाॅक्टरने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज बुधवारी (ता.२५) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. डाॅ.देवानंद जाजू (Devanand Jaju) असे आत्महत्या केलेल्या डाॅक्टरचे नाव आहे. शहरातील सिडको भागात जाजू रुग्णालयाच्या (Jaju Hospital) माध्यमातून वैद्यकीय सेवा देत होते. देवानंद जाजू हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वैद्यकीय आघाडीचे प्रमुख होते. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. (BJP Medical Front Chief Doctor Devanand Jaju End Himself In Nanded)

या प्रकरणी नांदेड (Nanded) ग्रामीण पोलिस तपास करित आहेत.गेल्या २० ते २५ वर्षांपासून डाॅ.जाजू हे वैद्यकीय सेवा देत होते. त्यांच्या पत्नीही डाॅक्टर आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी त्या बाहेरगावी राहतात. आज नांदेड ग्रामीण पोलिसांना डाॅ.जाजू यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

डाॅ.जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यावर जाजू यांचा मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

Lightning Strike : गेवराईत वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला जखमी

Electricity Shock : एमआयडीसीत सेल्को एक्स्ट्रुजन कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

SCROLL FOR NEXT