file photo 
नांदेड

नांदेडच्या रेल्वेस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील हजूर साहिब रेल्वेस्थानकावर अंदाजे ५६ वर्ष वय असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोमवारी (ता. एक) फेब्रुवारी पहाटे आढळला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात राखीव ठेवण्यात आला आहे.

नांदेडच्या रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात निराधार व भिकारी राहतात. त्यातील अनेकांना गंभीर आजार तर काही जण नशा करतात. यातच काहींचा नैसर्गीक मृत्यू होतो. असाच एक मृत्यू येथील हजुर साहेब रेल्वेस्थानकावर एक फेब्रुवारी रोजी पहाटे आढळला. हा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवास द्वारासमोर जनरल वेटिंग हॉलच्या पाठीमागे पडल्याची माहिती स्थानकप्रमुख यांनी लोहमार्ग पोलिसांना बिनतारी व लेखी संदेश पाठवून दिली. यावरुन लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार उत्तम कांबळे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सदरचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

सध्या तरी मृतदेहाची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे ५६ वर्ष, अंगाने मजबूत, चेहरा गोल, डोक्याचे केस बारीक, मिशा बारीक, रंग काळासावळा, अंगावर शर्ट, चॉकलेटी रंगाचे जॅकेट, मळकट रंगाची पॅन्ट, लाल रंगाची अंडरवियर अशा वर्णनाचा व्यक्ती कुणाचा नातेवाईक किंवा ओळखीचा असल्यास लोहमार्ग पोलिस हवालदार उत्तम कांबळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT