file photo 
नांदेड

नायगावच्या बेटकबिलोली येथे धाडसी चोरी : रोख रक्कमेसह अडीच तोळे सोने लंपास

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : बंद घराच्या दाराची कोंडी तोडून चोरट्यांनी सालगड्याला देण्यासाठी घरात ठेवलेले एक लाख ८० हजार नगदी तर लंपास केले. पण जाता जाता आडीच तोळे सोन्याचे दागिने घेवून गेल्याची घटना सोमवारी (ता. १२) रात्री तालुक्यातील बेटकबिलोली येथे घडली आहे. 

दरवर्षी गुडीपाडव्याला शेतात सालगडी ठेवण्याची मराठवाड्यात प्रथा असून सालगड्याचा पगार ठरवल्यावर त्यांना त्याच दिवशी रक्कम द्यावी लागते. त्यासाठी बेटकबिलोली येथील शेतकरी आत्माराम विठ्ठल पवार यांनी सालगड्याला पगार देण्यासाठी शेतमाल विकून एक लाख ८० हजार रुपये घरात आणून ठेवले होते. मंगळवारी (ता. १३) सालगड्याचा पगार ठरवण्यात येणार होता. पण गुडीपाडव्याच्या पुर्वसंध्येला चोरट्यांनी रक्कम लंपास केली असल्याने पवार यांच्यासमोर मोठे संकट उभ टाकल आहे. 

शेतकरी आत्माराम पवार हे नेहमीप्रमाणे सहकुटूंब घरात झोपले असता बाजूच्या खोलीची कडी तोडून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले एक लाख ८० हजाराची रक्कम तर चोरलीच पण जाता जाता चोरट्यांनी आडीच तोळ्याचे सोन्याचे दागिनेही लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ऐन गुडीपाडव्याच्या दिवशीच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घरात चोरी करुन सालगड्याला द्यावयाची रक्कमच लंपास केली असल्याने सालगड्याचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

चोरीच्या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी हे श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. पण काहीही उपयोग झाला नाही. मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरुच असून झालेल्या चोऱ्यांचा तर तपास लागलाच नाही पण चोरीच्या घटना थांबवण्यातही पोलीसांना यश येत नसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाची दिमाखात सांगता; पोर्तुगालच्या ॲक्वी चित्रपटाला सुवर्ण मयूर, ऋषभ शेट्टी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

जन्मत:च राजासारखा थाट घेऊन येतात 'या' राशीचे लोक! सूर्यदेव देतात अफाट तेज अन् आत्मविश्वास

Zoho Share Dispute: घटस्फोटाचा वाद पोहोचला कंपनीच्या अब्जावधी डॉलरच्या मालकीहक्कापर्यंत; झोहोचे श्रीधर वेम्बू वादात; पत्नीचे गंभीर आरोप?

Raj Thackeray Dombivli : 'SIR प्रक्रियेवर लक्ष दिलं नाही तर जागा वाढवून काय फायदा?'; डोंबिवलीतून राज ठाकरेंचे मनसैनिकांना मोठे आदेश

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये लग्नसमारंभ सुरू असतानाच लष्कराचा बॉम्बहल्ला; पाच मुलांसह २१ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT