file photo 
नांदेड

ब्रेकिंग न्यूज - नांदेडला दिवसभरात अकरा पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - कोरोना पॉझिटिव्हची संख्या नांदेडमध्ये वाढत चालली असून मंगळवारी (ता. १२) दिवसभरात अकरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी दुपारी बारड (ता. मुदखेड) येथील मुंबईहून आलेला तरुण पॉझिटिव्ह आढळून आला होता. आता रात्री नऊ वाजता आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पूर्वीचे ५२ आणि आजचे ११ असे एकूण ६३ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मुंबईतून चालत बारड (ता. मुदखेड) येथे आलेल्या बावीसवर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

ग्रामिण भागातही शिरकाव
बाधित तरुण कुटुंबीयांसह बारडकडे येण्यासाठी मुंबईहून पायी निघाला होता. त्यामध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे. मंठा येथून एक वाहन मिळाल्यानंतर हे सर्वजण रविवारी (ता. दहा) बारडला पोचले. यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, धर्मशाळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. यात तो तरुण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी आढळून आले. यामुळे माहूरनंतर आता बारडमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सदर तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.

तपासणी कुठेच का झाली नाही?
मुंबई येथून निघताना त्यांची कुठेही तपासणी झाली नाही. हे कुटुंब मुंबईत कामासाठी गेले होते. एकूण २२ जण मुंबई येथून पायी आले होते. त्यापैकी चारजणांना आजाराची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर तिघांचा अहवाल येणे बाकी आहेत. हे प्रवासी नागरिक बारडमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. यामुळे ते बारड येथे कोणाच्याही संपर्कात आले नाहीत. 

ग्रामीण भागातही आता चिंता
आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या नांदेड महापालिकेच्या हद्दीत होती. परंतु, चार दिवसांपूर्वी माहूर येथील एक साठवर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर मंगळवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे एक तरुण कोरोनाग्रस्त निघाल्याने ग्रामीण भागातही आता चिंता व्यक्त केली जात आहे. 
दरम्यान, मुंबईतून बारडला परतलेल्या अन्य तिघांचा अहवाल बाकी आहे. 

मंगळवारी रात्री दहा पॉझिटिव्ह
दरम्यान, मंगळवारी रात्री नऊ वाजता आणखी दहा पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी श्री. शेळके यांनी दिली. त्याचबरोबर सदरील दहाही रुग्ण हे लंगरसाहिब येथील असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेले दोन रुग्ण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरूच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT