file photo 
नांदेड

शौचालयाची भिंत अंगावर पडल्याने भाऊ ठार तर बहीण गंभीर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : बिलोली तालुक्यातील कासराळी येथे हे घरामागे खेळणाऱ्या दोन बहिण भावाच्या अंगावर शेजारी असलेल्या शौचालयाची भिंत कोसळली. यात भाऊ ठार झाला तर बहिण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

कासराळी येथील लहान मुल खेळण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात गेली. खेळत असतांना शेजाऱ्यांच्या शौचालयाची भिंत या बहिण भावावर अचानक कोसळली. यात सहा वर्षे वयाच्या भावाचा दुर्दैवी अंत झाला तर आठ वर्षीय बहिण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

कासराळी येथील प्रभाग पाचमधील नवीन वस्तीत त्यांचे घर असून त्यांच्या घरामागे त्यांची मुलं खेळण्यात दंग असताना या बहिण भावावर शेजारील शौचालयाची एका बाजूची भिंत कोसळली ज्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी जबर जखमी झाली. तिच्यावर नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही भाऊ बहीण कोसळलेल्या भिंतीच्या विटांच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढले. तरी कुटुंबातील ही दुर्दैवी घटना मनाला वेदना देणारी आहे. या घटनेनंतर महिलांनी एकाच आरडाओरडा केल्याने नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन भावंडांना बाहेर काढले. मात्र बाहेर काढण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT