Nanded News 
नांदेड

नांदेडात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शिवचरण वावळे

नांदेड - नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडन्ट अँड युथ फ्रंटने भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम त्वरित जमा करण्यासाठी समाजकल्याण कार्यालय, नांदेडसमोर शुक्रवारी (ता.२५) तीव्र आंदोलन केले. तसेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मागील दोन वर्षांपासून भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जात नाही. शैक्षणिक वर्षात पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागत आहे. उच्च शिक्षणामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. या संदर्भात शासनाला विविध संघटनेने तसेच नसोसवायफने निवेदन देऊन सुद्धा सामाजिक न्याय मंत्री व समाजकल्याण विभाग विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. 

 शिष्यवृत्ती, स्वाधारची पूर्ण रक्कम त्वरित जमा करा

कोरोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेत असतांना आर्थिक समस्येला समोर जात आहेत. मागील शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधारची रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नसल्याने चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशापासून वंचित राहत आहेत.या संदर्भात ता.१५ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते. निवेदनानुसार संघटनेने जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधारची पूर्ण रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी केली होती.

यांची उपस्थिती होती 

या मागणीकडे मागील दहा दिवसांपासून सामाजिक न्याय मंत्री व समाजकल्याण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शुक्रवारी (ता.२५) नसोसवायफ या संघटनेने तीव्र आंदोलन करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन दवणे, प्रा.सतिश वागरे, प्रकाश दिपके यांच्यासह अनेकाची उपस्थित होती. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रभारी संदीप जोंधळे, अक्षय कांबळे, सुजय पाटील, मनोहर सोनकांबळे, शुभम दिग्रसकर, सागर घोडके, बाळू भाग्यवंत, डॉ. प्रवीण सावंत, दिनेश येरेकर, अनुपम सोनाळे, सुमित कांबळे, संकेत मेहत्रे, आदिनाथ डोपेवाड, शाहिद शेख, जुनेद शेख, अनिल इजगरे, विशाल घोसले, मधुकर काळे यासह मोठ्या संख्यने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT