file photo 
नांदेड

नियमानुसार एन- 95 मास्कची खरेदी व विक्री करा- मा. ज. निमसे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत जनतेने मास्कची खरेदी करावी. तर ता. २० ऑक्टोंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या विक्री किंमतीत एन-95, ३ व २ प्लाय मास्कची विक्री औषध विक्रेत्यांनी करावी. कोणता औषध विक्रेता जास्त किंमतीत मास्कची विक्री करत असल्यास त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालयास करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे यांनी केले आहे.

सध्या देशात व राज्यात कोविड-19 चा संसर्ग सुरु असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या अनलॉकडाऊन प्रक्रीया सुरु असून शासनाने टप्प्या- टप्याने दैनंदिन व्यवहार, दळणवळण वाहतूक यांना परवानगी दिली आहे. परंतु खबरदारी म्हणून शासनाने सामाजिक अंतर राखणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे इत्यादी बाबी बंधनकारक केल्या आहेत. 

प्रशासनाच्यावतीने कायदेशिर कारवाई 

त्यामुळे सामान्यांना मास्क वापरणे व त्याची खरेदी करणे शक्य व्हावे याकरीता शासनाच्या ता. २० ऑक्टोंबर रोजीच्या निर्णयानुसार एन-95, ३ व २ प्लाय मास्क यांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे सर्व घाउक, किरकोळ उत्पादकांना शासन निर्णयानुसार मास्कची विक्री निश्चित केलेल्या विक्री किंमतीस विक्री करणे बंधनकारक केले आहे. मास्कचे दरपत्रक दुकानाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावे. शासन निर्णयाच्या अंमलबजावनीसाठी प्रशासनाच्यावतीने औषध विक्रेत्यांच्या  तपासण्या करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार औषध निरीक्षक औषध विक्रेत्यांच्या तपासण्या करत आहेत. तपासणीत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्ती विरुध्द प्रशासनाच्यावतीने कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT