file photo 
नांदेड

सावधान...नांदेडला एक हजार ३३० कोरोनाबाधित; दिवसभरात दहा जणांचा मृत्यू

अभय कुळकजाईकर

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) प्राप्त झालेल्या पाच हजार ४७३ अहवालापैकी एक हजार ३३० अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३४ हजार ३३७ एवढी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात उपचार सुरू असताना दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर ४३८ जणांवर औषधोपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कैलासनगर नांदेड येथील ४९ वर्षे पुरुष, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील ८५ व ४८ वर्षे दोन महिला, राज कॉर्नर नांदेड येथील ८० वर्षे पुरुष, मिलत्तनगर नांदेड येथील ६० वर्षे पुरुष, बोरगाव (ता. लोहा) येथील ८० वर्षे महिला, विनायकनगर नांदेड येथील ७२ वर्षे महिला, हदगाव येथील ७९ वर्षे पुरुष, राज कॉर्नर नांदेड येथील ८० वर्षे पुरुष, विद्युतनगर नांदेड येथील ७५ वर्षे महिला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत्त रुग्णांची संख्या ६६८ एवढी झाली आहे. 

५९ बाधितांची प्रकृती अतीगंभीर 
आजच्या पाच हजार ४७३ अहवालापैकी चार हजार ३८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३४ हजार ३३७ एवढी झाली असून यातील २६ हजार २९३ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण सात हजार १४४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ५९ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवारी एकूण ४३८ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.५७ टक्के आहे. 

सात हजार १४४ बाधितांवर औषधोपचार सुरु 
नांदेड महापालिका क्षेत्रात मंगळवारी तब्बल ८८८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सात हजार १४४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. नांदेड महापालिका अंतर्गत गृहविलगीकरण चार हजार ३९९ तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात एक हजार १९९ तर खासगी रुग्णालय ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे दहा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात ४० तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २० एवढी आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - सर्दी, खोकला, तापाने उडविली नागरिकांची झोप

नांदेड कोरोना मीटर 

  • एकुण स्वॅब- दोन लाख ८० हजार ९७३ 
  • एकुण निगेटिव्ह - दोन लाख ४० हजार ८७९ 
  • एकुण पॉझिटिव्ह - ३४ हजार ३३७ 
  • एकूण बरे - २६ हजार २८३ 
  • एकुण मृत्यू - ६६८ 
  • प्रलंबित स्वॅब - ४११ 
  • उपचार सुरू - सात हजार १४४ 
  • अतिगंभीर - ५९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

"ते जुने गाऊन मी सिनेमात वापरले" भार्गवीने सांगितला वन रूम किचन सिनेमाचा खास किस्सा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग; बाजूच्या दुकानांनाही फटका

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

SCROLL FOR NEXT