नांदेड : मुलांनो शाळेत न चुकता या सीईओ वर्षा ठाकूर घुगे sakal
नांदेड

नांदेड : मुलांनो शाळेत न चुकता या...सीईओ वर्षा ठाकूर घुगे

जिल्ह्यात शाळा झाल्या सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुलांनो दररोज न चुकता शाळेत या. अभ्यास करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला देत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सोमवारी (ता. १३) नांदेड तालुक्यातील नांदूसा येथील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट व विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

दीर्घ काळानंतर सोमवारी ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांची सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तीन हजार ११५ शाळा आणि दोन लाख पाच हजार २० विद्यार्थी तर शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीच्या ३३४ शाळा आणि ८६ हजार ४८ विद्यार्थी आहेत या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातील शाळा सज्ज झाल्या होत्या. पहिल्या दिवशी ठाकूर -घुगे यांनी नांदुसा येथील शाळेला भेट दिली. त्यांच्या समवेत प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर होते.

कोरोना काय आहे? हात स्वच्छ का धुवायचे? व्यायाम केल्याने काय होते? तुम्हाला कोण व्हायला आवडेल? असे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. कुणी गाणी म्हटली तर कुणी कविता, कोणी एखादा सुविचार सांगीतला. अशाप्रकारे सगळी शाळा आनंदमेळा झाली.

लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आजचे चित्र बघून मी आनंदी झाल्याचे वर्षा ठाकूर यांनी सांगितले. सरपंच प्रतिनिधी भास्कर जनुकवाडे, शिक्षक तसेच आठवीतील काही विद्यार्थींनीनी आम्हाला आठवीनंतर शिक्षणाची सोय करा. गावातच नववी आणि दहावीचा वर्ग उघडा, अशा पद्धतीची मागणी केली.

अंगणवाडीचे कार्य असमाधानकारक

अंगणवाडी क्रमांक एकमध्ये ठाकूर घुगे यांनी भेट दिली असता कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविकेला काहीही सांगता आले नाही. लाभार्थ्यांची संख्या देखील नीट सांगता येत नव्हती. साहित्याचे वाटप केल्याच्या नोंदी देता येत नव्हत्या. हा प्रकार पाहून त्या संतापल्या. मात्र, अंगणवाडी क्रमांक दोनमध्ये कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकेच्या उत्कृष्ट कामाबद्दल वंदना गवारे व ज्योती गोदरे यांचा त्यांनी सत्कार केला. तेव्हा अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीसाठी वीज कनेक्शन, एलईडी टीव्ही देण्याची मागणी केली. शाळांना मोफत वीज पुरवठ्याबाबत किंवा शाळांचे वीज देयक अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT