file photo 
नांदेड

हदगाव तालुक्यातील त्या सातगावतील नागरिकांची ससेहोलपट थांबेना; अशोक चव्हाण यांनी लक्ष घालण्याची मागणी

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापुर तालुक्यात समाविष्ट झालेल्या हदगाव तालुक्यातील त्या सात गावातील लोकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. शासकीय कामकाज जलदगतीने व्हावे, पैसा व वेळेची बचत व्हवी यासाठी ही सात गाव अर्धापूर तालुक्यात आली खरी पण महसुल वगळता सर्व शासकीय आभिलेखे सध्या हदगाव तालुक्यातच आहेत.

शासकीय अभिलेखे अर्धापूर तालुक्यातील कार्यालयात हस्तांतरित होत नाहीत तोपर्यंत या सात गावातील नागरिकांची अवस्था वाळूतून निघून मातीत पडले अशीच राहणार आहे. ही सात गावे अर्धापूर तालुक्यात समाविष्ट होवून दोन वर्षे झाली तरी दोन्ही तालुक्यातील प्रशासन जैसे थे आहे.

हदगाव तालुक्यातील चाभरा, चाभरा तांडा, सोनाळा, रोडगी, निमगाव, खैरगाव, चोरंबा या सात गावातील नागरिकांनी आपली गावे अर्धापूर तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी खुप मोठी लढाई केली. या गावातील नागरिकांनी अठरा वर्षे लढा दिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी हदगाव तालुक्यातून अर्धापूर तालुक्यात आली. गावांचा समावेश अर्धापूर तालुक्यात झाल्यावर कामे लवकर होतील अशी आशा होती. पण झाले निराळेच.

शासकीय काम आणि सहा महिने थांब असे म्हंटले जाते. त्याचा प्रत्यय या सात गावातील नागरिकांना येत आहे. गेल्या दोन वर्षात केवळ वन विभाग, नोंदनी कार्यलय, महसुली कामकाज वगळता सर्व अभिलेखे हदगावात तालुक्यात असल्यामुळे असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. आरोग्य शिक्षण, पंचायत समितीचे सर्व अभिलेखे, कृषी आदी कामगाज सध्या हदगाव तालुक्यातून होत आहे.

अर्धापूर येथील प्रशासन आपल्या गावी या आभियानासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आले असता दोन्ही विभागाचे उपविभागीय अधिकारी, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग, शिक्षण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून या सात गावातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. या गावातील नागरिकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे अशी नागरिकांची भावना आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील एसआयआर पूर्णपणे रद्द करावा आणि यापुढे मतदान बॅलेट पेपरवर घ्या - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT