file photo 
नांदेड

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सेवांचा वापर करावा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सध्या सर्वत्र कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला आहे. यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. या सेवांचा नागरीकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. तसेच पुढीलप्रमाणे सेवा सुविधांचा वापर अनिवार्य केला असून त्याचा वापर करुन दस्त नोंदणीबाबत सहकार्य करावे असे, आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी केले आहे.

नागरीकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDEद्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरीकांनी या PDEडाटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर इस्टेप इन या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयात दुरध्वनीवर समक्ष संपर्क साधुन वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे. प्रत्येक व्यक्तीने सह्यासाठी स्वत:चे पेन आणावा. एकच पेन एकमेकात सह्यासाठी वापरु नये. 

आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे. मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह ॲड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यत थांबवण्यात येत आहे. सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठया शहरात म्हणजेच जिल्ह्याचे ठिकाणी व तालुक्याचे ठिकाणी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात 9.45 ते 6.15 या वेळेत सुरु राहील. जिल्ह्यातील सर्व कार्यालयाचे कामकाज शनिवार, रविवार व शासकीय सुटी वगळता सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहतील. यांची नागरीकांनी नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT