सीटी स्कॅन करताना 
नांदेड

नांदेडमध्ये वर्षभरात सात हजारपेक्षा अधिक रुग्णांचे सिटीस्कॅन

कोरोना आजारापूर्वी डोक्याला गंभीर दुखापत, किंवा मेंदु संदर्भात इतर आजार असणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा जुजबी रुग्णास सिटीस्कॅन करण्याची गरज नसते.

शिवचरण वावळे

नांदेड ः विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दिवसाला हजारो बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी अनेकांना गंभीर दुखापत झालेली असते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाचे सिटीस्कॅन करावे लागते. परंतु त्यासाठी खासगी रुग्णालयात तीन ते चार हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो. मात्र शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून अगदी माफक दरात सिटीस्कॅन केले जाते. मागील वर्षभराच्या काळात शासकीय रुग्णालयात सात हजार ४७१ रुग्णांनी सिटीस्कॅन सेवेचा लाभ घेतला आहे.

कोरोना आजारापूर्वी डोक्याला गंभीर दुखापत, किंवा मेंदु संदर्भात इतर आजार असणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा जुजबी रुग्णास सिटीस्कॅन करण्याची गरज नसते. त्यामुळे अत्तापर्यंत डोक्याला मार लागलेल्या सर्वाधिक रुग्णास सिटीस्कॅन केल्याची नोंद आढळते.

एरव्ही दिवसाला जिल्हाभरातील साडे तीशनेच्या असपास रुग्णांचे सीटीस्कॅन नोंद होत असे, परंतु एप्रील- २०२० पासून या आकड्यात दुपटीने वाढ झाली. नको असताना देखील सीटीस्कॅनसाठी रांगा लागत असल्यामुळे गंभीर व अत्यावश्‍यक रुग्णांना सीटीस्कॅनचा वेळेवर लाभ मिळत नव्हता.

हेही वाचा - अनलॉक जाहीर झाल्याने लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अशा आहे

शिवाय कोरोना संशयीत रुग्णांचे सीटीस्कॅन केल्याने त्यापासून इतर रुग्णास पॉझिटिव्हचा धोका निर्माण झाला होता. असे असले तरी, कोरोना काळात विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात अविरतपणे सीटीस्कॅन सुरु असल्याने १२ महिण्यात सात हजार ४७१ जणांनी लाभ घेतला आहे. जानेवारी २०२१ मध्ये सर्वाधिक एक हजार पाच रुग्णांचे सीटीस्कॅन झाल्याची नोंद झाली आहे.

अशी आहे एप्रील २०२० व मार्च २०२१ पर्यंतची आकडेवारी ः

एप्रिल- ४४३, मे- ३५८, जून- ५०९, जुलै- ४१३, आॅगस्ट- ५०२, सप्टेंबर- ५२०, आॅक्टोबर- नोव्हेंबर- ७०६ आणि डिसेंबर - ८१३.

तर २०२१ मध्ये जानेवारी- एक हजार पाच, फेब्रुवारी ९१८ व मार्च ६९९ असे एकूण सात हजार ४७१ रुग्णांचे सीटीस्कॅन करण्यात आले आहे. यातील निम्मे रुग्ण हे कोरोना संशयीत होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जास्तीत जास्त झाडे वाचवून नवीन लागवडीवर भर देणार"

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

SCROLL FOR NEXT