Nanded News 
नांदेड

मुख्यमंत्री म्हणतात घरी राहा सुरक्षित रहा, दहावी-बारावीची आॅफलाईन परीक्षा कशी देणार

प्रमोद चौधरी

नांदेड ः एप्रिल महिन्यामध्ये दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे. परंतु, मुख्यमंत्री म्हणतात घरी राहा सुरक्षित राहा अशा परिस्थितीत आॅफलाईन परीक्षा कशी देणार, असा प्रश्न आता विद्यार्थी व पालकांना पडला आहे.

यावर्षी बारावीची परीक्षा देणारा वेदांत पोफळे याने सकाळशी बोलताना सांगितले की, मागील वर्षापासून विद्यार्थी आॅनलाईन परीक्षा होणार यादृष्टीकोनातून तयारी करत आहेत. शासनाने त्यावेळी सर्व परीक्षा या आॅनलाईनच घेतल्या जातील, असे सांगितले होते. विशेष म्हणजे पालकांनीसुद्धा ऑनलाईन परीक्षेसाठीच पसंती दाखवली होती. आजही आहे. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा आॅफलाईन घेण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत.
कारण सद्यस्थितीत सर्वत्र भीतीचे वातावरण असताना आपल्या पाल्याला परिक्षेसाठी परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे हे पालकांच्या दृष्टीने कितपत योग्य ठरणार आहे ? 

सरकारने एकदा पालक आणि विद्यार्थी यांच्या जागी उभे राहून विचार करावा. 
एखाद्या मुलाला कोरोनाची लागण झालेली असेल आणि त्याची बाब ही परीक्षाच्या परिसरात आल्यावर दिसून आल्यास त्याचे आणि बाकीच्या मुलांचे आणि पालकांचे जीव वेठीस धरले जातील, याचाही विचार सरकारने करायला पाहिजे, असेही वेदांत पोफळे यांनी सांगितले.

विद्यार्थी व पालकांना पडलेले प्रश्न
 

  • परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन? जर शासनाने ठरवलेल्या निकषानुसार परीक्षा ऑफलाईन झाली तर   
  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडतांना आणि आणतांना होणारी गर्दी ? 
  • गावाकडील विदयार्थ्यांना होणारी धावपळ?
  • उत्तर पत्रिका आणि प्रश्न पत्रिका ही किती जणांच्या संपर्कातून आलेली असेल तिचा स्पर्श ?
  • कोरोनाची भिती मनात ठेऊन परीक्षा देतांना येणारा ताण आणि गुणांवर होणारा परिणाम ?

आता सगळं जग आधुनिक होत जाणार आहे तर त्याची सुरवात आत्ता पासून का नाही ? मुख्यमंत्री साहेब ह्यांनी सांगितले आहे " घरी राहा सुरक्षित राहा " पण ऑफलाईन परिक्षे मुळे घरी तर राहता येणार नाही आणि त्यामुळे सुरक्षित पण राहता येणार नाही. एक विद्यार्थी या नात्याने पडलेले प्रश्न आहेत सरकारने खरच एकद पुनर्विचार करावा 
- वेदांत पोफळे, बारावीचा विद्यार्थी नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT