File photo 
नांदेड

नांदेड :  कोणत्याही विषाणूसाठी थंडी असते पोषकच, खबरदारीची गरज

प्रमोद चौधरी

नांदेड :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी घेण्याची गरज आहे. कोणत्याही विषाणूसाठी थंडीचे दिवस पोषक असतात. दुपारी ऊन, रात्री थंडी अशा विषम तापमानाचा शरीरावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

निरोगी राहण्यासाठी वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु पारा खाली वर होत असला की, आजार होणार हे निश्‍चित. यामुळे खबरदारी घ्यावी लागते, वृद्धमंडळी, बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वारंवार हवामानात बदल होत असल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील म्हणाले की, थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे किरकोळ आजार होतात. वेळीच खबरदारी न घेतल्यास आजार बळावून संधिवात, दमा असे आजार होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यातच शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रासही होवू शकतो. सध्या कोरोनाचा हा त्रासदायक काळ आहे. थंडीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ होण्याची भिती आहे. 

हेही वाचा - नांदेडकरांसाठी गुड न्यूज : रक्त पिशवीच्या दराबाबत आता दर निश्चित
  
त्वचा, केसांना त्रास 
हिवाळ्यात त्वचा व केसांना त्रास होतोच. यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. गार वारे, उडती धूळ यामुळे काही विशिष्ट त्वचाविकार थंडीच्या काळात जास्त आढळून येतात. थंडीच्या दिवसात रंगीबेरंगी गरम कपड्यांनी सजलेल्या दुकानांत गर्दी असते. परंतु अंगात घातलेल्या लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेला खाज सुटू शकते तसेच तळपायाची त्वचा हिवाळ्यात जास्त कोरडी झाल्याने भेगा पडू शकतात. ज्या व्यक्तींना कोरड्या त्वचेमुळे होणारे विकार असतात, त्यांचे आजार थंडीत तीव्र होण्याची भिती असते, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. 

  • उबदार कपड्यांचा वापर 
  • आहारात स्निग्ध पदार्थ - आले घातलेला चहा 
  • ताक, दही, आइस्क्रीम नको 
  • दुचाकीवरून जाताना काळजी घ्यावी 
  • अंघोळीसाठी कोमट पाणी 
  • चेहऱ्याला व डोक्‍याला रुमाल बांधावा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT