जिल्हाधिकारी डाॅ. विपीन नांदेड 
नांदेड

कोविडने अनाथ झालेल्या बालकांच्या काळजीसाठी पालक म्हणून पुढे या- डॉ. विपीन इटनकर

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलाची आज बैठक संपन्न झाली, या बैठकीत ते बोलत होते.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या संसर्गामुळे (Covid virus) आतापर्यंत सुमारे एक हजार 860 व्यक्तींना प्राणास मुकावे लागले असून यातील प्रत्येकांच्या कुटुंबियांसह ज्यांनी लहान मुले आहेत. त्यांच्यावर आलेली वेळ सांभाळने ही आव्हानात्मक आहे. ज्या मुलांचे पालक यात गेले आहेत त्यांना सावरण्यासाठी, त्यांची काळजी व संरक्षण (care taker) देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकिय कामे तात्काळ होणे गरजेची आहेत. जिल्ह्यातील अशा बालकांची माहिती विहित मुदतीत पुर्ण होण्यासाठी यातील सहभागी झालेल्या शासकिय कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरीचा भाग म्हणून याकडे न पाहता पालकांच्या भावनिक ओलाव्यातून यासाठी तत्पर झाले पाहिजे, या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (dr. vipin Itankar) यांनी सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली. (Come- forward- as a -parent- to -take care- of the children -orphaned- by Kovid- Dr- Vipin- Itankar)

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलाची आज बैठक संपन्न झाली, या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस मनपा आयुक्त सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते.

हेही वाचा - पीएम केअर फंडातून गुरु गोविंदसिंघ शासकीय रुग्णालयात होत असलेल्या आॅक्सिजन प्लांटची पाहणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली

जिल्ह्यात आजवर कोरोना अर्थात कोविड-19 मुळे एक हजार 860 व्यक्ती प्राणास मुकले असून त्यांच्या कुटुंबावर जी काही शोककळा पसरली आहे त्याचा विसर संबंधित यंत्रणांनी कधी पडू न दिला पाहिजे. यात मुलांचा विषय हा भावनिक आणि मानसिक या दोन्ही दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. जिल्ह्यात अशी अनाथ मुले असतील तर त्यांच्या पर्यंत शासकिय योजना तात्काळ पोहचाव्यात यासाठी एका मिशन मोडवर सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून काम करणे अपेक्षित असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले.

शुन्य ते सहा वर्षाच्या वयोगटातील बालकांचे पालक जर कोविडने आजारी असतील आशावेळी त्या बालकांची काळजी घेण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसेल तर अशा बालकांची व्यवस्था शिशूगृहात केली जाणार आहे. याबाबत शासनाने आदर्श कार्यपद्धती निर्गमीत केली आहे.

शुन्य ते 6 वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT