file photo 
नांदेड

दिलासादायक - नांदेडला कोरोनाचा बुधवारी एकही नवीन बाधित नाही

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात १३ अहवालांपैकी १३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. एकही बाधित आढळला नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या २८६वर स्थिरावली. २८६ पैकी आतापर्यंत १८० बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उर्वरीत ९३ बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत.

औषधोपचार चालू असलेल्या तीन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

२३६ व्यक्तींचे स्वॅबची प्रतिक्षा
नांदेड जिल्ह्यात ९३ बाधित व्यक्तींपैकी विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ५९, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे १३ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. बुधवारी (ता. १७ जून) २३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या गुरुवारी सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोनाविषयी संक्षीप्त माहिती 

  • सर्वेक्षण - १ लाख ४५ हजार ५६८
  • घेतलेले स्वॅब - ५ हजार ४५७
  • निगेटिव्ह स्वॅब - ४ हजार ६४३
  • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - निरंक
  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - २८६
  • स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - २२०
  • स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - ८६
  • मृत्यू संख्या - १३
  • रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - १८०
  • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - ९३
  • स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या - २३६ 

अफवांवर विश्वास ठेवू नये 
कोरोनासंदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल. प्रशासनास जनतेने सहकार्य करावे.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड.
   

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT