NND19KJP01.jpg 
नांदेड

सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी......कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी धर्माबाद, नायगाव, हदगाव व भोकर तालुक्यातून आल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषगांने कृषी विभागाकडून सोयाबीनच्या शेतीची पाहणी सुरु केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनीही गुरुवारी (ता. १८) धर्माबाद तालुक्यात पाहणी केली. तक्रारी संदर्भात तालुकास्तरीय समितीकडून चौकशी होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

सर्वाधीक सोयाबीनचे क्षेत्र
नांदेड जिल्ह्यात सोयाबीनची तीन लाख ९५ हजार हेक्टर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात बियाणे महामंडळासह विविध खासगी कंपन्याकडून सोयाबीन बियाणे कृषी निविष्ठा केंद्रावर दाखल झाले. बियाणे उत्पादक कंपनीकडून मिळालेले सोयाबीन भिजलेले असल्याने ते कुजलेल्या अवस्थेत दिसत होते. त्यावेळी काही विक्रेत्यांनी ठोक विक्रेत्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. बियाणे उगवण्याची शाश्वती नसल्यामुळे असल्याचा अंदाज कृषी विक्रेत्यांना आल्यामुळे काही दुकानदारांनी बियाणे उगवण क्षमतेबाबत खात्री दिली नव्हती. परंतु असे सदोष बियाणे विक्रीला आल्यानंतर त्यावर प्रतिबंध घालणे गरजेचे होते, अशी चर्चा आहे. 

मृग नक्षत्रात पेरणी
यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या. परंतु बियाणे पेरल्यानंतर ते बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत धर्माबाद तालुक्यातुन ३५, नायगावमधून दोन ते तीन, हदगाव तालुक्यांतून पाच ते सहा तर भोकर तालुक्यातूनही पाच ते सहा शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याची तक्रार आल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. 

तालुकास्तरीय समितीकडून चौकशी
या तक्रारीच्या अनुषगांने संबधीत तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून पंचनामा होणार आहे. यानंतर या समितीचा अहवाल विभागीय कार्यालयाला पाठविणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली. बियाणे उगवण झाली नसल्याबाबतच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगीतले.  ज्या भागात शंभर मिलीमीटर पाऊस झाला, अशा ठिकाणी बियाणांची उगवण झाली. परंतु ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी उगवण कमी झाल्याचे दिसुन येत आहे. 

आमदार राजेश पवार यांची तक्रार
नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी त्याच्या मतदारसंघात सोयाबीनचे बाेगस बियाणे विक्री केल्याची तक्रार नांदेडच्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. तक्रारीत इगल, जानकी, व सारस या कपंन्याचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केली. पेरणीनंतर ते बियाणे उगवले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही बाब गंभीर असून याबाबत कृषी विभागाने पाहणी करावी, तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी व दुकानदारावर कारवाइ करण्याची मागणी केली आहे.  

पेरणीसाठी घाइ नको
शेतकऱ्यांना सोयाबीन ता. १५ जुलैपर्यंत पेरता येते. त्यामुळे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीनची पेरणीची पेरणी करु नये. 
- रविशंकर चलवदे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT