नांदेड : जल जिवन मिशनव्दारे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे, अशा गावांमधील नागरिकांना वैयक्तिक नळ जोडणी देण्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत असा मंत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिला आहे.
जिल्हयातील गट विकास अधिकारी, उप अभियंता, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यकारी अभियंता संजय बाविसकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.यू. इंगोले यावेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला २०२४ पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष आहे.
हेही वाचा - Success Story-नांदेड : तळ्याची वाडी येथील गावरान पपईला मोठी मागणी, कष्टाचे चीज- शेतकरी शंकर वाकोडे
सध्या नांदेड जिल्ह्यात एकूण पाच लाख चार हजार ५१२ कुटूंबापैकी एक एप्रिलपर्यंत केंद्र शासनाच्या जल जिवन मिशनच्या संकेतस्थळावर एक लाख १५ हजार ५६५ नळजोडणी केलेल्या कुटूंबांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
चालू वर्षातील नळजोडणीच्या ५५ हजार ७८६ नोंदी करण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरीत उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक घराला नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी गावस्तरावर सर्वेक्षण करुन २०२४ पर्यंतचा आराखडा गट विकास अधिकारी यांनी तयार करावा.
हे देखील वाचाच - नांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; लोहा शहरातील घटना
पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या ‘अ’ श्रेणी मधील गावातील कुटूंबांना नळ जोडणी देवून सदर लाभार्थ्यांचे नाव जल जिवन मिशनच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करावे. पाणी पुरवठयाची कामे सुरु असलेल्या गावामधील कामे गतीने करुन या ‘ब’ श्रेणीतील गावातही नळ जोणीचे नियोजन करावे. तर ‘क’ श्रेणीतील गावांना पाणी पुरवठा योजनांचे आराखडे तयार करावेत, अशा सुचनाही वर्षा ठाकूर यांनी केल्या आहेत.
नळ जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरु
ज्या गावात पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण झाल्या आहेत, त्या गावात आता वैयक्तिक नळ जोडणी देण्याचे काम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याव्दारे प्राधान्याने दलितवस्ती, शाळा व अंगणवाडींमध्ये नळ जोडणी देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. - वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, नांदेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.