Complete railway projects Marathwada  Sakal
नांदेड

मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करा ; काब्दे व पदाधिकाऱ्यांची मागणी

जनता विकास परिषदेची मागणी, नांदेडमध्ये बैठक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मराठवाड्यातील संकल्पित नगर - बीड - परळी रेल्वे मार्ग व वर्धा - यवतमाळ - नांदेड या मार्गांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात आशादायक तरतूद करण्यात आली आहे. तरीही मराठवाड्यातील अनेक रेंगाळलेले प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याबद्दल दिलासा अर्थसंकल्पातून मिळालेला नाही.

नांदेड - बिदर रेल्वेमार्गाला मंजुरीचे गाजर दाखविले खरे परंतु कोणतीच समाधानकारक तरतूद नाही. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करावेत, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जनता विकास परिषदेची येथे बैठक झाली. प्रा. के. के. पाटील, प्रा. जीवन देसाई, द. मा. रेडडी, प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड, प्रा. दामोधर थोरात, डॉ. मोहन फुले व रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शंतनू डोईफोडे, ओमप्रकाश वर्मा आदी उपस्थित होते. मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. भागवत कराड व रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. मराठवाड्याच्या रेल्वे व इतर विकास प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष देण्याची अपेक्षा असल्याचा सूर जनता विकास परिषदेने व्यक्त केला.

मंजुरी पण ठोस तरतूद नाही

अर्थसंकल्पात अपुरी तरतूद झाल्यामुळे नगर - परळी व वर्धा - नांदेड हे प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. नांदेड - बिदर या प्रकल्पाला मंजुरी मिळूनही कोणतीच ठोस तरतूद केली नाही. त्यामुळे नांदेड - बिदर, नांदेड - लातूर रोड, सोलापूर - उस्मानाबाद हे रखडलेले प्रकल्प कालबद्धरितीने पूर्ण करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नोकर भरती करून लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे काम कधी सुरु होणार, याकडे सर्वांचे लक्ष असल्याचे परिषदेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT