mohan hambarde 
नांदेड

Attack on MLA in Nanded: नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराच्या गाडीची तोडफोड; किर्तनाच्या कार्यक्रमाला आले असताना हल्ला

भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आमदाराची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Congress MLA mohan hambarde car vandalized)

कार्तिक पुजारी

नांदेड- भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आमदाराची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची गोडी फोडण्यात आली आहे. नांदेडमधील पिंपळगाव येथील ही घटना आहे. या घटनेने एकच खळबळ उडालीये.

मराठा आंदोलकांनी हंबर्डे यांची कार फोडली असल्याची माहिती आहे. आमदार हे पिंपळगाव निमजी गावात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. माहितीनुसार, आमदार हंबर्डे गे सुरक्षित आहेत. (Congress MLA mohan hambarde car vandalized in Nanded maratha reservation andolan)

मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. राज्यातील काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. महामंडळाची एसटी बस जाळण्यात आली होती. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर चर्चा करण्यासाठी २० फेब्रुवारीला राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. जोपर्यंत सगेसोयरे यांना आरक्षण देण्याचा कायदा बनत नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्याची तरतूद केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT