file photo 
नांदेड

अर्धापुरात हाथरस घटनेच्या निषेधार्थ काॅंग्रेसचा मोर्चा

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : केंद्रातील मोदी सरकारच्या काळात महिलांवर आत्याचार वाढले असून देशभरातील महिला असुरक्षित आहेत. उत्तरप्रदेशात महिलांवर आत्याचार वाढत आहेत. हाथरस घटनेतील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी आशी मागणी आमदार आमरनाथ राजूरकर यांनी सोमवारी (ता. पाच).केली. काॅग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला.

उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्हात एका मुलीवर झालेल्या अमानुष आत्याचार व खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ काॅग्रेसच्या वतीने देशव्यापी धरने आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनास अर्धापूर शहरांत खुप मोठा प्रतिसाद मिळाला. या धरने आंदोलनात काॅग्रेसच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते व जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेवून धरने आंदोलन केले. तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हाथरस घटनेचा तिव्र शब्दात निषेध करून योगी सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यात आल.

हाथरस घटनेचे तीव्र पडसाद अर्धापूर शहरांत उमटले

हाथरस घटनेचे तीव्र पडसाद अर्धापूर शहरांत उमटले आहेत. काॅग्रेसच्या वतीने धरणे व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रज्ञा बौद्ध विहारात पिडीत मुलीला श्रध्दांजली अर्पण करून मौन धारण करण्यात आले. यानंतर प्रज्ञा बौद्ध विहारापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बसस्थानक परिसर, बसवेश्वर चौकमार्गे तहसील कार्यालयाच्या परिसरात जावून सांगता करन्यात आली. या मोर्चात आमदार आमरनाथ राजूरकर, आ.माधवराव पाटील जवळगावकर,  आ.मोहनराव हंबर्डे , आ.रावसाहेब अंतापूरकर, माजी खासदार तूकाराम रेंगे, महापौर मोहिनी यवनकर, जिल्हा परिषद आध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, रेखा चव्हाण, मंगलाताई निमकर    जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाआध्यक्ष बालाजी गव्हाने, शहराध्यक्ष राजु शेटे, शेख लायक, डाॅ विशाल लंगडे, सभापती कांतबाई सावंत, सुमेरा बेगम, प्रजापती लोणे, रेखाताई काकडे, महिला तालुका काॅग्रेसच्या आध्यक्षा उज्ज्वला इंगोले, मनिषा सिनगारे आदी पदाधिकारी सहभागी झाले.

तहसील कार्यालयाच्या परिसरात योगी मोदी हटाव देश बचाव आदी घोषणा देण्यात आल्या..

या आंदोलनात, आनंदराव कपाटे नासेर खान पठान, पप्पु बेग, प्रवीण देशमुख, मुसबीर खतीब, उमेश सरोदे, संजय लोणे, अशोक सावंत, शंकर ढगे, गणेश बोंढारे, आमोल डोंगरे, चंद्रमुणी लोणे, रंगराव इंगोले, छत्रपती कानोडे, महंमद सुल्तान, कैलास भुस्से , बाळू पाटील, बालाजी कदम, व्यंकटराव साखरे, शबाना बेगम, पंडित लंगडे आदी उपस्थित होते..

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

SCROLL FOR NEXT