file photo 
नांदेड

नांदेडकरांना बुधवारी दिलासा....कसा तो वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी (ता. १७) सायंकाळी पाचपर्यंत प्राप्त झालेल्या १३ अहवालातील सर्वच १३ अहवाल प्राप्त झाले. एकही बाधित रुग्ण आढळला नसल्यामुळे यामुळे नांदेडकरांना रविवारनंतर बुधवारी दिलासा मिळाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २८६ वर स्थिरावली आहे. यातील १८० बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. उर्वरीत ९३ बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत. २३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

२३६ व्यक्तींच्या स्वॅबची प्रतिक्षा 
औषधोपचार चालू असलेल्या तीन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तेरा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ९३ बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ५९, मुखेड उपजिल्हा रुग्णालयता १३ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल आहेत. पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. बुधवारी (ता. १७) २३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल, अशी माहिती डॉ. भोसीकर यांच्याकडून देण्यात आली. 

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती 
सर्वेक्षण - एक लाख ४५ हजार ५६८
घेतलेले स्वॅब पाच हजार ४५७
निगेटिव्ह स्वॅब चार हजार ६४३ 
बुधवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २८६
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या २२०
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ८६
मृत्यू संख्या - १३
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १८०
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ९३
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या २३६

‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करावा
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्याव. यामुळे आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT