file photo 
नांदेड

आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी आरोग्य सेविका पदे भरणार!

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) :  नांदेड जिल्ह्यातील आदिवासीबहुल, अतिदुर्गम, डोंगराळ किनवट, माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून जीएनएम, एएनएम आरोग्य सेविकांची भरती करण्याची व त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना अवगत केले आहे. लवकरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना निघणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिले आहे.

माहूर आणि किनवट प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका कर्मचारी यांच्या रिक्त पदांचा अनुशेष कायम असल्या कारणाने आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात सर्वसाान्य रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले असून यावर आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून जीएनएम,एएनएम या आरोग्य सेवकांची कंत्राटी पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबऊन त्यात कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी आमदार केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना आमदार केराम यांच्या मागणी वजा पत्राचा संदर्भ घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचित केले आहे.

तशा स्वरुपाचे पत्र आमदार भीमराव केराम यांना प्राप्त झाले आहे. आमदार केराम यांच्या पत्राची दखल घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी पद भरती करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून लवकरच ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे संकेत आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे. यावरुन जीएनएम, एएनएमचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणींना आमदार भीमराव केराम यांनी रोजगाराची संधी निर्माण करुन दिली असून कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेविकांना देखील प्राधान्यक्रम देण्याची मागणी असल्याने त्यांनी कोरोना काळात बजावलेल्या सेवेचा लाभ त्यांना मिळणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

SCROLL FOR NEXT