Nanded News 
नांदेड

नांदेडमध्ये एकाचवेळी होतात कोरोना आणि इतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार

प्रमोद चौधरी

नांदेड ः जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, सोबतच मृत्यूंचीही संख्या वाढत आहे. कोरोना बाधीत रुग्णांना गोवर्धन घाट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. सोबतच इतर आजारांनीही मृत व्यक्तींवर येथेच उपचार होत असल्याने, महापालिकेच्या कारभाराचे धिंडवले उडाले आहेत.

सद्यस्थितीत नांदेडमधील गोवर्धन घाट स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी दोन-तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाने मृत झालेल्या आणि नसलेल्या मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार केले जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कोरोना आणि नाॅन कोरोना रुग्णांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. बहुतांश रुग्ण नांदेड शहरातील रहिवासी असल्याने गोवर्धन घाट, वसरणी आणि सिडको येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. सद्यस्थितीमध्ये गोवर्धन घाट स्मशानभूमीत बाधित रुग्णांवरील अंत्यसंस्कारांसाठी रांगा लागत आहेत. याठिकाणी कोरोना नसलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करणे तसेच त्यावेळी त्यांच्या कुटुंब नातेवाईक यांची उपस्थिती असणे संसर्ग पसरण्यासाठी धोकादायक ठरत आहे.

शनिवारपासून सुमारे 15 ते 20 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. शुक्रवारी (ता.27) 27 मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवर्धन स्मशानभूमीत दहन विधी करण्यासाठी बारा लोखंडी जाळ्या आहेत. दहन विधी केल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतर अग्नी थंड होईपर्यंत काही वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.  गोवर्धन घाट स्मशानभूमीत कोरोना बाधित रुग्णांवरील अंत्यसंस्कारासाठी अपुरी पडू शकते अशी परिस्थिती आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन शुक्रवारपासून जुना मोंढा नवीन पुलाजवळील राम घाट परिसरात केवळ नोंदणी केलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे. तरीदेखील परंपरेप्रमाणे अनेकजण गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नोंदणी करत आहेत.  एकाच वेळी कोरोना बाधित आणि कोरोना नसलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार होत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा धोका लक्षात घेऊन कोरोना बाधित मृतांवर तसेच नाॅन कोविड मृतांवर अंत्यसंस्कारासाठी वेगळी व्यवस्था करावी.  तसेच दहन विधीसाठी जास्तीच्या जाळ्या उपलब्ध करून मृतांची हेळसांड थांबविण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT