file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील सगरोळीत कोरोनाचा दे धक्का....११ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग...

अभिजीत महाजन

सगरोळी (ता. बिलोली, जिल्हा नांदेड) : चार महिन्यानंतर अखेर सगरोळी (ता. बिलोली) येथे कोरोनाने शिरकाव केला असून एका ६२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित व्यक्तीपासून ११ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

येथील ६२ वर्षीय पुरुषास आठ दिवसांपूर्वी ऱ्हदय रोगाचा त्रास झाल्याने कुटुंबीयांनी हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी सर्व तपासण्या झाल्यानंतर कोरोनाची लक्षणे त्यांच्यामध्ये आढळली असल्याने त्या रुग्णालयाने नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना केल्या. शनिवार (ता. २५) रोजी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोरोनाची तपासणी केली असता सदर व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बाधित व्यक्तीच्या कुटुंब व संपर्कातील १४ व्यक्तींना तत्काळ बिलोली येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. मंगळवार (ता. २८) रोजी सकाळी अहवाल प्राप्त झाला असून ह्या १४ व्यक्तींपैकी तब्बल ११ व्यक्तींना संसर्ग झाला तर दोघांचा नकारात्मक व एक व्यक्तीचा अहवाल नाकारण्यात आला आहे. सगरोळीमध्ये चार महिन्यानंतर प्रथमच कोरोनाने रविवारी एका व्यक्तीपासून शिरकाव केला त्यामुळे सोमवारी येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. बाधित व्यक्तीच्या घराचा परिसरहि  प्रशासनाने  बंद केला होता.

काळजी व नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन

मागील चार महिन्यापासून येथील ग्रामपंचायात व प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे येथील संपूर्ण परिसर हा ग्रीनझोन मध्ये होता. रविवारी (ता. २६) रोजी सायंकाळी ६२ वर्षीय पुरुषास कोरोनाचा संसर्ग  झाल्याची माहिती येताच सगरोळी व परिसरात चर्चेला उधान आले होते. त्यानंतर अकरा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये, मनामध्ये भीती बाळगू नये, प्रशासनाच्या नियमांचे सर्वांनी  पालन करण्याचे अवाहन  करण्यात आले आहे.

सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीची बैठक

पुढील उपाययोजनेसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकारांच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये गट विकास अधिकारी श्री. नाईक, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड, डॉ. विनोद माहुरे,  सरपंच प्रतिनिधी व्यंकट सिद्नोड, उपसरपंच रोहित देशमुख व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी प्रसाद लाड यांना धमकी, संभाजीनगरमध्ये दोघांना अटक! गणेश उगले, योगेश शितोळे कोण?

MS Dhoni खेळणार की नाही, हा प्रश्न खरंच तुम्ही मला विचारताय? CSK कोच असं काही बोलून गेले की...

Annasaheb Patil Corporation : मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारची मोठी खेळी! अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटी; कोणाला मिळणार लाभ?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलसाठी रांगा

Land Records: भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; राज्यभर १५०० खासगी भूमापकांची नेमणूक होणार, पुण्यातील प्रलंबित अर्जांचा डोंगर कमी होणार

SCROLL FOR NEXT