file photo 
नांदेड

कोरोना ब्रेकिंग : 87 व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी, 196 बाधितांची भर तर चोघांचा मृत्यू   

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  शनिवार 15  ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 87 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टीदेण्यात आली आहे. याचबरोबर 196 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 48 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 148 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 769 अहवालापैकी  1 हजार 565 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 11 एवढी झाली असून यातील 2 हजार 312 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 537 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 181 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

मृत व्यक्तींची संख्या 144 एवढी झाली आहे.  

शुक्रवार 14  ऑगस्ट रोजी मुदखेड माळकौठा येथील 75 वर्षाचा एका पुरुषाचा, लोहा येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा, नांदेड सोमेश कॉलनी येथील 20 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर शनिवार  15 ऑगस्ट रोजी दीपनगर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 144 एवढी झाली आहे.  

आज बरे झालेल्या 87 कोरोना बाधित

आज बरे झालेल्या 87 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 11, नायगाव कोविड केअर सेंटर 17, हदगाव कोविड केअर सेंटर 15, खाजगी रुग्णालय 7, अर्धापूर कोविड केअर सेंटर 3, बिलोली कोविड केअर सेंटर 1, माहूर कोविड केअर सेंटर 1, लोहा कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, मुखेड कोविड केअर सेंटर 8, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 5, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय कोविड केअर सेंटर 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, कंधार कोविड केअर सेंटर 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 3, बारड कोविड केअर सेंटर 3 असे एकूण 87 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 48

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 10, लोहा तालुक्यात 5, नायगाव तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1 , मुदखेड तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 4,  अर्धापूर तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, उमरी तालुक्यात 11, उदगीर तालुक्यात 1 असे एकुण 48 बाधित आढळले.

अँटिजेन तपासणीद्वारे 148

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 82, अर्धापूर तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 26, किनवट तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 22, नांदेड ग्रामीण 8, हदगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, हिंगोली तालुक्यात 1 असे एकुण 148 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 537 बाधितांवर औषधोपचार सुरु

जिल्ह्यात 1 हजार 537 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 197, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 604, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 33, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 30, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 34, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 107, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 99, लोहा कोविड केअर सेंटर येथे 22, हदगाव कोविड केअर सेंटर 34, भोकर कोविड केअर सेंटर 25,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 70, किनवट कोविड केअर सेंटर येथे 34, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 17, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 8, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 27, बारड कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 17, खाजगी रुग्णालयात 135 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 337,

घेतलेले स्वॅब- 29 हजार 184,

निगेटिव्ह स्वॅब- 23 हजार 40,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 196,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 011,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 144,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 312,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 537,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 614, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 181.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT