file photo
file photo 
नांदेड

कोरोना ब्रेकिंग : नांदेडने ओलांडला एक हजाराचा टप्पा, मंगळवारी ३२ बाधित, तर दोघांचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात मंगळवार (ता. २१) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज ३२ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ४० व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शहराच्या आंबेडकरनगर भागातील एका २७ वर्षाीय तरुणाचा तर रहेमतनगर येथील एका ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सदर बाधितास शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ४४ एवढी झाली आहे. यात ४४ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.

आजच्या एकूण १३४ अहवालापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण        बाधितांची संख्या आता एक हजार १८ एवढी झाली आहे. यातील ५५५ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४११ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ३४ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात १७ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे.

४० बाधीत झाले बरे

आज बरे झालेल्या ४० बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील एक, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील एक, बिलोली तीन, पंजाब कोविड केअर सेंटर येथील आठ, हदगाव एक, मुदखेड पाच, देगलूर पाच, जिल्हा रुग्णालय दोन, खासगी रुग्णालयातील १४ बाधितांचा यात समावेश आहे.

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

शहराच्या वजिराबाद एक, काबरानगर दोन, फत्तेबुरूज किल्ला एक, आनंदनगर दोन, सोमेश काॅलनी एक, निझाम काॅलनी एक, वाडी नांदेड एक, शिवाजीनगर एक, महिला रुग्णालय नांदेड एक, कासराळी ता. बिलोली एक, रावी ता. मुखेड एक, खैरका ता. मुखेड एक, मुक्रमाबाद एक, कुंटुर एक, सिईओ निवासस्थान परिसर देगलूर एक, लाईनगल्ली देगलूर पाच, मरखेल पोलिस ठाणे एक, बाहेगाव रोड देगलूर एक, नागोबा मंदीर देगलूर एक, शेलगाव ता. देगलूर एक, कोतेकल्लुर ता. देगलूर तीन, भुत्तनहिप्परगा ता. देगलूर एक, पूर्णा जिल्हा परभणी एक आणि वसमत जिल्हा हिंगोली एक. 

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४११ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १४१, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १३, जिल्हा रुग्णालय येथे २८, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ४१, देगलूर कोविड केअर सेंटर येथे २३, माहूर कोविड केअर सेंटर १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे ३, लोहा कोविड केअर सेंटर येथे १२, कंधार कोविड केअर सेंटर येथे २, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, खाजगी रुग्णालयात ३९ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित सहा निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार २८७
घेतलेले स्वॅब- १० हजार ६६२,
निगेटिव्ह स्वॅब- ८ हजार ५९६,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-३२
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १०१८,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- २,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-२,
मृत्यू संख्या- ४४,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ५५५,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ४११,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३०२.  

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT