File Photo 
नांदेड

Corona Breaking : नांदेडात दोघांचा मृत्यू, ११ पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड : मागील साडेतीन महिण्यात जिल्ह्यातील सहा महिण्याच्या बालकापासून ते ७० वर्षाच्या महिला - पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शनिवारी (ता.११ जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदाच एका ३३ वर्षीय महिलेचा तर, २८ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  

आत्तापर्यंत बाधीत झालेल्या रुग्णांपैकी पन्नास वर्षांपुढील बाधीत रुग्णांची उच्चरक्तदाब, दमा, मधुमेह अशा गंभीर स्वरुपाचे आजार असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. परंतु शनिवारी (ता.११) मृत्यूची नोंद झालेली महिला व पुरुष तरुण असून, इतक्या तारुण्यात कोरोनामुळे मृत्यू होणारे हे पहिलेच रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. 

एका तासाच्या अंतराने दोघांचा मृत्यू 

शनिवारी (ता. ११) मृत्यू झालेली महिला (वय ३३) भोकर येथील तेली गल्ली गांधी चौक येथील रहिवाशी असून, बहिमपुरा नांदेड येथील पुरुष (वय २८) यचा गुरुवारी (ता. नऊ) पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्यानंतर शनिवारी (ता. ११) सकाळी एका तासाच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाला आहे. 

दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११ ने वाढली आहे. वाढलेल्या रुग्णांमध्ये बिलोली येथील नागनी पुरुष (वय ३०), बिलोली कुंडलवाडी पुरुष (वय २६), वजिराबाद पुरुष (वय ६४), भोकर तेली गल्ली गांधीचौक महिला (वय ३३), देगलुर नाका वाल्मिक गल्ली पुरुष (वय ४४), मुखेड नगर पालीके जवळच्या दोन महिला (वय ३०, ४५), मुखेड बाजार मोहल्ला पुरुष (वय ४०), बळीरामपूर दूधडेअरी पुरुष (वय २८), देगलुर भायेगाव महिला (वय ३६) व तेरी बोर पुरुष (वय ३२) या ११ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५६९ 

शुक्रवारी (ता. दहा) २४ तासात ३४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात शनिवारी ११ बाधीतांची भर पडल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६९ झाली असून, ३५८ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता २७ इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 
    
कोरोना मीटर- 

-आज पॉझिटिव्ह रुग्ण- ११
-मत्यू - दोन
-एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - ५६९
-कोरोनावर मात -३५८
-एकुण मृत्यू-२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT