file photo 
नांदेड

कोरोना : पुढे या नांदेडकरांनो- महापालिकेची विशेष मोहिम 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोना या विषाणूने आपले पाय मजबुत करत असल्याने सर्वत्र या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी आता महापालिका व जिलहा प्रशासनाकडून पुढे या नांदेडकरांनो या मोहिमेंतर्गत आता संशयितांची अॅन्टीजेन रॅपीड टेस्ट होणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभाग होऊन कोरोनाची साखळी तोडावी असे आवाहन महापालिका आयुक्त डाॅ. सुनिल लहाने आणि जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केले आहे. 

नांदेड शहरात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शनिवार (ता. १८) पासून कोरोना संशयितांची अॅन्टीजेन रॅपीड टेस्ट करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या चाचणीतून आता कोरोनाचे संशयित अर्ध्या तासात पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह हे स्पष्ट होत आहे. या टेस्टच्या माध्यमातून कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी शहरात महापालिकेच्या माध्यमातून पुढे या नांदेडकर अषी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जुलैमध्ये मोठ्या संख्येने वाढली आहे. एकूण रुग्णांचा आकडा आता एक हजारांच्या जवळ  पोहोचला आहे. नांदेडमध्ये कोरोना संशयितांच्या स्वॅबची तपासणी दोन ठिकाणी केली जात होती. त्यापैकी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा बंद करण्यात आली आहे. कारण या प्रयोगशाळेतील कर्मचारी कोरोना बाधीत निघाले होते. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेवर ताण आला आहे. 

पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्याला ५०० कीट टेस्टसाठी उपलब्ध 

जिल्ह्यात जून अखेरीस कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३८७ इतकी होती. जुलैमध्ये ही संख्या ९८६ वर पोहोचली आहे. त्यामुळे २० दिवसातील कोरोना रुग्णांचा हा वाढता आलेख चिंताजनकच आहे. जिल्हा प्रशासनाने १८ जुलैपासून नांदेडमध्ये अॅन्टीजेन रॅपीड टेस्ट प्रणालीचा वापर करून कोरोना संशयितांना तपासण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्याला ५०० कीट टेस्टसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये १८ जुलै रोजी केलेल्या तपासणीत २८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर १९ जुलै रोजी १९ जणांचा आणि २० जुलै रोजी १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे.

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची तयारी सुरु

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ५०० किटसद्वारे तपासणी करण्यात आली आहे. आणखी पाच हजार किट्स जिल्ह्याला तीन ते चार दिवसात उपलब्ध होणार आहेत. या किट्स उपलब्ध झाल्यानंतर नांदेडमध्ये कोरोना तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एका विशेष वाहनाच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून किट्स प्राप्त होताच महापालिका पुढे या नांदेडकर ही विशेष मोहीम हाती घेणार आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची तयारी सुरू आहे. या विशेष मोहिमेत लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. या संसर्गाला आळा घालण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल असे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी सांगितले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT