Corona Update News sakal
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सामान्य; रविवारी ३३ अहवाल बाधित

५८ रुग्ण कोरोना आजारातून झाले बरे; १६१ रुग्णांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सामान्य होताना दिसत आहे. रविवारी (ता.१३) प्राप्त झालेल्या एक हजार २९ अहवालापैकी ३३ अहवाल बाधीत आले आहेत. ५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ५४० एवढी झाली असून यातील ९९ हजार ६९१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रविवारी दिवसभरात उपचार सुरु असलेल्या गंभीर बाधित रुग्णांपैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्‍ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजार ६८८ स्थिर आहे.(Nanded Corona Update News)

आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत १५, नांदेड ग्रामीण एक, बिलोली एक, मुखेड तीन, नायगाव एक, देगलूर दोन, किनवट दोन, उमरी दोन, माहूर एक, औरंगाबाद एक, बुलढाणा एक, यवतमाळ दोन व परभणी एक असे एकूण ३३ बाधित आढळले आहेत.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ४०, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात ९६, खासगी रुग्णालयातील ११ असे एकूण १६१ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यापैकी पाच बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित ः एक लाख दोन हजार ५४०

  • एकूण बरे ः ९९ हजार ६९१

  • एकूण मृत्यू ः दोन हजार ६८८

  • रविवारी बाधित ः ३३

  • रविवारी मृत्यू ः शून्य

  • रविवारी बरे ः ५८

  • उपचार सुरु ः १६१

  • गंभीर रुग्ण ः पाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT