लग्न सोहळा 
नांदेड

कोरोना संकट : विवाह सोहळ्यांवर फिरले पाणी; अर्थव्यवस्थेलाही फटका

बाजारपेठेत सन्नाटा आहे. सर्वच क्षेत्रात नकारात्मक प्रतिसाद आहेत. लग्नसोहळ्यातील मंगल सूर बेसूर झालेत.

अमोल जोगदंड

मालेगाव ( जिल्हा नांदेड ) : कोरोनामुळे जनजीवन ठप्प (Corona) आहे. संचारबंदी अजून किती दिवस हे निश्चित नाही. तरी यंदा हंगामातील विवाह मुहूर्तावर पाणी फिरले आहे. जूनपर्यंतचे विवाह सोहळे (wedding programe in june)स्थगित करण्याची वेळ आली. विवाह जुळलेल्या तसेच आप्तेष्ट व नातेवाईकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. (Corona crisis: water flowing at wedding ceremonies; It also hit the economy)

बाजारपेठेत सन्नाटा आहे. सर्वच क्षेत्रात नकारात्मक प्रतिसाद आहेत. लग्नसोहळ्यातील मंगल सूर बेसूर झालेत. नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला. यंदा लग्न सोहळे होणारच नाहीत असे चित्र आहे. विवाह सोहळ्यास केवळ 25 लोकांची उपस्थिती असे फर्मान निघाले आहे. लॉन्स, मंगल कार्यालयाकडे न जाणेच लोकांनी पसंत केले. कोरोना रुग्ण गावोगावी वाढत असल्याने काहींनी नातेवाईक, आप्तेष्ट, भावकी मित्रमंडळींना न बोलवता वधू व वराकडील मोजक्याच उपस्थित विवाह उरकले आहेत.

हेही वाचा - 711 किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पुणे, बारामती, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, जहीराबाद, हैदराबाद ही शहरे जोडली जाणार आहेत.

या आहेत लग्न तिथी

मे, जून व जुलै या तीन महिन्यात तब्बल 29 विवाह मुहूर्त होते मे महिन्यातील 1, 2, 3, 5, 8 तारखांचे मुहूर्त वाया गेले. 13, 15, 21, 22, 24, 26, 28, 30 व 31 तर जून मध्ये 4, 6, 16, 19, 20, 26, 27, 28 तर जुलै महिन्यात 1, 2, 3, 13, 18 असे विवाह मुहूर्त शिल्लक आहेत. अनेकांनी तारखा निश्चित केल्या. मात्र कोरोनामुळे कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली. दिवाळीनंतर नवीन तारखा धरून सोहळ्याला गती येणार आहे.

व्यवसायिकांनाही फटका

शहरी तसेच ग्रामीण भागातील नियोजित सोहळे रद्द करण्यात आल्याने लॉन्स, मंगल कार्यालय, वाजंत्री, केटर्स ,डेकोरेटर, छापखाने ,फर्निचर दुकानदार, सराफ, कापड दुकानदार, मंडपवाले, छायाचित्रकार यांच्या व्यवसायांना फटका बसला आहे.

मोठी गुंतवणूक करुन स्टुडीओ चालवणे अवघड बनले आहे. संचारबंदी लागू असल्याने दुकाने देखील बंद आहेत. साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस, वास्तुशांतीसारखे कार्यक्रम पुढे ढकलल्याने नोंदणी करण्यात आलेल्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. मोठे नुकसान होऊ लागले आहे. छायाचित्रकारांना शासनाने मदत करावी.

- विवेक चिंचवड, छायाचित्रकार, मालेगाव ता. अर्धापूर

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT