1508850407cover.jpg 
नांदेड

कोरोना ईफेक्ट; ‘स्वारातीम’चे कामकाज ३१ मेपर्यंत बंद

श्याम जाधव


नवीन नांदेड ः ‘कोरोना’ (कोविड-१९) या विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयांचे सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज येत्या (ता.३१) मेपर्यंत बंद राहणार आहे. विद्यापीठ परिसर आणि उपपरिसर येथील संचालक आणि प्रशासकीय विभागप्रमुख यांच्यासह वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी यांनी कामकाजाच्या निकडीनुसार कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच आपल्या अधिनस्त वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रोटेशन पद्धतीने कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल, असे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या निर्देशनुसार विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाद्वारे कळविले आहे.


प्रशासकीय कामकाज बंदच
कोरोना’ (कोविड-१९) या विषाणूच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रकान्वये कळविल्याप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये कोरोना’ (कोविड-१९) या विषाणूचे देशभरातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, सर्व संलग्नित महाविद्यालये, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै. श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज (ता. ३१) मेपर्यंत बंद राहणार आहे. येथील प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज पूर्ण करावे.


रोटेशन पद्धतीने कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक
विद्यापीठ परिसर आणि उपपरिसर येथील संचालक आणि प्रशासकीय विभागप्रमुख यांच्यासह वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकारी यांनी कामकाजाच्या निकडीनुसार कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच आपल्या अधिनस्त वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रोटेशन पद्धतीने कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
विद्यापीठ तसेच महाविद्यालयास कार्यालयीन कामकाजासाठी एखाद्या प्राध्यापक, अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची गरज भासल्यास विभागप्रमुख किंवा प्राचार्य यांच्या आदेशानुसार संबंधित प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी. आणि ता. ३१ मे, २०२० पर्यंत मुख्यालय सोडू नये, असेही कळविण्यात आले आहे.


आवश्यकतेनुसार उपस्थिती असावी
विद्यापीठाच्या वतीने यापूर्वी दिलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ बाबतच्या परिपत्रकाचे जशास तसे आदेश लागू राहणार आहेत. पुढील सूचनांसाठी, अधिक माहितीकरिता विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच आपला ई-मेल आयडी पहावा. प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेची विद्यापीठास आवश्यकता असेल त्या वेळी आवश्यकतेनुसार संबंधितास विद्यापीठ कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup for Children: कफ सिरपमध्ये नेमकं काय? रिनल बायोप्सीतून समोर आलं मुलांच्या मृत्यूचे कारण

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव अम्पायरला भिडला; दुसऱ्या डावात गोल्डन डकवर परतला Video Viral

आरक्षणासाठी केलेल्या आत्महत्यांमागे मोठा कट? आत्महत्या करणाऱ्यांनी नव्हे, तर दुसऱ्यांनीच लिहिल्या 'त्या' चिठ्ठ्या; धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Weather Alert : राज्यातील 'या' जिल्ह्यांत पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Cough Syrup : कफ सिरपसाठी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी! १५ चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर अन्न व औषध प्रशासन विभाग अ‍ॅक्शन मोडवर, औषध विक्रेत्यांना दिल्या सूचना

SCROLL FOR NEXT