nnd12sgp08.JPG 
नांदेड

धर्माबादेत अखेर कोरोनाची ‘एंट्री’

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः जगभरात व महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अखेर रविवारी (ता.१२) धर्माबादेतही शिरकाव केला. कुंडलवाडी येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या संपर्कात आल्यामुळे धर्माबाद येथील एका पोलिस अधिकारी व त्यांच्या परिवारातील दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून, तिघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.


माष्टी येथेही कोरोनाचा रुग्ण
शहरातील गुलमोहर कॉलनी सील करण्यात आली असून, तालुक्यातील माष्टी येथेही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.


विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील प्रशासनाने अहोरात्र परिश्रम घेतल्यामुळे सुरवातीपासून धर्माबाद तालुक्यात प्रशासनाला कोरोना निगेटिव्ह ठेवण्यात यश आले होते. त्यामुळे शनिवारी (ता.११) जुलैपर्यंत तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुका वगळता सर्व तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अखेर धर्माबादेत कोरोनाची एंट्री झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी रविवारी सकाळी आपल्या दालनात तालुका प्रशासनाची बैठक घेऊन कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

यावेळी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत बेळदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख एकबाल, मंडळ अधिकारी नामदेव माळोदे, तलाठी सहदेव बासरे व इतर कर्मचारी उपस्थित होते; तसेच येथील माहेश्वरी भवनमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरला उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेख एकबाल व सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी डॉ. संजय पोहरे, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. वेणुगोपाल पंडित, डॉ. प्रदीप म्याकलवार उपस्थित होते.

संपादन - स्वप्निल गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cow Smuggling Crackdown : गो-तस्करांची आता खैर नाही, 'मोक्का' अंतर्गत होणार कारवाई; फडणवीस सरकारचे कडक आदेश

Pune Municipal Corporation: पुणे प्रशासनात खांदेपालट; आयुक्तांकडून निलंबन रद्द करत बदलीचा निर्णय, महापालिकेत मोठी उलथापालथ

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

Mumbai Metro: मुंबईकरांची उडाली धांदल, कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत, व्हिडिओ व्हायरल

PM Modi Five Nation Tour : PM मोदी 5 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले; भारतासाठी करून आणली 'एवढ्या' लाख कोटींची गेमचेंजर डील!

SCROLL FOR NEXT