file photo 
नांदेड

नांदेड आरटीओ कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कार्यालय 30 एप्रिलपर्यत बंद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यालयीन कामकाज जसे की, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणी व इतर कामकाज नियंत्रीत केले, तरीही गर्दी रोखणे शक्य होत नाही. कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांचा कोरोनापासून बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दिर्घकालिन परिणाम होण्याची शक्यता संभवते. 

त्यामूळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ता. सात ते 30 एप्रिल 2021 या कालावधीपर्यत खटला विभाग व आस्थापना विभाग वगळता कार्यालयाचे संपूर्ण दैनंदिन कामकाज व शिबीर कार्यालयाचे कामकाजही 30 एप्रिल 2021 पर्यत बंद करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने वाहननिषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्रांची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढविलेली आहे, यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांचेमार्फत जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेले असून त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध केला आहे. या कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाजनिमित्त येणाऱ्या अजर्दारांची संख्या खूप जास्त असल्याने सदर जमावबंदी आदेशाची उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्य:स्थितीत या कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे 20 अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटूंबीय यांना कोरोनाची लागण झाली असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. 

यास वेळीच प्रतिबंध न केल्यास उर्वरित अधिकारी व कर्मचारी यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. संबंधित कालावधीमध्ये ज्या लोकांनी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहे, अशा लोकांनी त्या अपॉईंटमेंट रद्द करुन पुन्हा नवीन अपॉईंटमेंट त्यांच्या सोईप्रमाणे घ्याव्यात, जुनी अपॉईंटमेंट रद्द करणे ही प्रक्रीया ऑनलाईन असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. 30 एप्रिल 2021 नंतर कार्यालयात तत्कालिन शासन निर्णयाप्रमाणे कार्यरत असेल यांची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी व कार्यालयास सहकार्य करावे, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT